शेवगा पाल्याची भूकटी थेट साता समुद्रापार अमेरिकेत रवाना, शेतकऱ्याचा हटके प्रयोग
कोरोनामध्ये शेवग्याच्या शेतीत नुकसान झाले होते. त्यातून झालेला खर्च सुद्धा निघाला नव्हता. त्यानंतर त्यांना शेवग्या ऐवजी शेवग्याच्या पाल्याची भूकटी करून विकण्याची कल्पना सुचली, त्यानंतर त्यांच्या शेतीला प्रचंड यश आलेे आहे. अनेक आजारांवर ही पावडर गुणकारी आजार आहे.

शेती आता उत्पन्न मिळत नाही असे रडगाणे न गाता एका शेतकऱ्याने अभिनव प्रयोग करीत नवा जुगाड केला आहे. त्याने शेवग्याच्या पाल्याची शेती केली आहे. शेवग्याच्या शेंगा विकून अनेक शेतकरी श्रीमंत झाले असतील परंतू शेवग्याचा पाला विकून मालामाल झालेल्या शेतकऱ्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे. कारण या शेतकऱ्याच्या शेवग्याचा पाला भूकटीच्या स्वरुपात थेट अमेरिकेत साता समुद्रापार रवाना झाला आहे.
शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे अनेक शेतकरी आपण पाहिले असतील, परंतु शेवगा शेतीतून पाला आणि त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा विक्रम करमाळा तालुक्यातील साडे येथील युवा शेतकऱ्यांनी नोंदवला आहे. अशा प्रकारची हटके शेती करणारा महादेव मोरे हा महाराष्ट्रातील पहिला शेतकरी ठरला आहे. महादेव मोरे या शेतकऱ्याने तब्बल साडेसात एकरावर शेवग्याच्या झाडांची लागवड केली आहे. शेवग्याच्या पालापासून पावडर करून ते हवाबंद ड्रममध्ये 25 किलोप्रमाणे भरून अमेरिकेला पाठवत आहेत. त्यातून त्यांनी लाखो रुपये कमावलेले आहेत. सुरुवातीस महादेव मोरे यांनी दुष्काळामध्ये एक एकरावर शेवगाच्या शेतीचा प्रयोग केला होता. कोरोनामध्ये शेवग्याच्या शेतीत नुकसान झाले होते. त्यातून झालेला खर्च सुद्धा निघाला नव्हता. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा न विकता शेवग्याच्या पालाची पावडरकरून विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्याला मोठे यश आले आहे.
शेवग्याच्या शेंगा चर्चेत असल्या तरी शेवग्याचा पाला कधीही चर्चेत नव्हता. पण त्याची पावडर करून विकण्याची कल्पना त्यांना युट्युबवर गुजरातमधील शेवगा शेती पाहिल्यानंतर सुचली. सुरुवातीला एक ते दीड एकरात शेवग्याच्य झाडांची लागवड केली. तसेच शेवगा पाल्याच्या पावडरीचा प्रयोग केला. देशात कोलकाता, हैदराबाद, नागपूर आणि मुंबई तसेच पुणे येथे पाव किलो पासून दोन किलोपर्यंत शेवगा पाल्याची पावडर विकली जात आहे. पहिल्या वर्षी शेवगा पाला पावडरची उत्पादन एकरी चार ते पाच टन निघाले. हा प्लॉट आठ ते दहा वर्षे चालतो. आठ दहा दिवसांतून एकदा पाणी घालावे लागते असे महादेव मोरे सांगतात.




हे गुणकारी औषध
बीपी शुगर सह 300 आजारांवर शेवगा ज्याला हिंदीत मोरींगा म्हणतात हे गुणकारी औषध आहे. मुतखडा आणि मुळव्याध हे दोन रोग वगळले तर सर्वच रोगांवर शेवगा गुणकारी आहे. शेवगा पाला मोरिंगा पावडर औषधे तयार करण्यासाठी उपयोगात आणली जाते. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता गांडूळ खत आणि शेणखत त्याशिवाय शेवग्याच्या पाल्यांपासून तयार केलेली लिक्विड म्हणून द्यावी लागते, शेवग्यांवर रोगराई होत नसल्याने फवारणी करण्याची काही गरज नाही. एक एकरासाठी सुमारे 70 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो यातून चार ते पाच लाख उत्पन्न मिळत आहे.