Papaya : पपई दरावर तोडगा पण वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीचे काय? कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती राज्यातील बळीराजा घेत आहे. दक्षिण कोकणात अवकाळीमुळे आंबा फळबागायत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे तर मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कामे उरकती घेतली जात आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर वेगळीच समस्या आहे. रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे.

Papaya : पपई दरावर तोडगा पण वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीचे काय? कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
नंदूरबार जिल्ह्यामध्ये पपई पीक अंतिम टप्प्यात असताना वाढत्या उन्हामुळे फळगळतीचा धोका वाढला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:11 PM

नंदूरबार : निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती राज्यातील बळीराजा घेत आहे. दक्षिण कोकणात अवकाळीमुळे (Mango Orchard) आंबा फळबागायत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे तर (Marathwada) मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कामे उरकती घेतली जात आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर वेगळीच समस्या आहे. रब्बी हंगामातील (Papaya Crop) पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी विचित्र परस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसाय करावा तरी कसा ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वर्षभर केवळ पदरी नुकसानच पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हे पपई बागा उध्वस्त करीत असल्याचे चित्र आहे. उत्पन्न तर सोडाच पण वर्षभर केलेला खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही.निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे.

वाढत्या तापमानाचा परिणाम काय?

जिल्ह्यात वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ मुळे दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला. विषाणू जन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपई ची फळे पिवळे पडत आसल्याने शेतकऱ्याचा बागा उध्वस्त होत आहेत. जिल्ह्यात आचानक तापमानात वाढ झाली तापमान 40 अंश सेल्सिअस चा वर तापमानाचा पारा गेला आहे. पानगळ झाल्याने सूर्य प्रकाश थेट फळावर पडत आसल्याने त्याचा परिणाम पपई च्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही.

संरक्षण हाच एकमेव पर्याय

वाढत्या ऊन्हामुळे पपईची पानगळ झाली आहे. त्यामुळे सूर्य प्रकाश थेट पपईंवर येत असल्याने पपई ही पिवळी पडली आहे. शिवाय अनेक ठिकाणी पपई पिकाचा खराबा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल खराब झाला नाही त्यांनी पपईला आवरण घालणे महत्वाचे आहे. सध्या उन्हामध्ये तीव्र वाढ झाली असून अजून काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई बचावासाठी गोणपाटाचा वापर करुन फळ सुरक्षित ठेवणे हाच पर्याय असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे पद्माकर कुंडे यांनी सांगितले आहे.

रस शोषणाऱ्या कीडीचाही प्रादुर्भाव

यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यामधून पपई बागांचीही सुटका झाली नाही. अगोदर पावसामुळे रस शोषणाऱ्या कीडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पाने गुंडाळली गेली तर पपई बागांची अपेक्षित वाढच झाली नाही. तर आता अंतिम टप्यात होत असलेल्या नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार आहे. मध्यंतरी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये दरावरुन मतभेद होते. ते मिटले असून आता थेट उत्पादनाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

Bhandara : ‘रोहयो’ चा उद्देश साध्य, भंडाऱ्यातील 85 हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम

Weather Report : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!

Non Stop LIVE Update
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.