वडील वारले अन् शिक्षण अर्धवट सोडलं… शेतीत ढोरासारखा राबला… आज करोडोंची संपती; लेमन किंग कमावतोय लिंबातून पाण्यासारखा पैसा
शेतीत ढोरासारखा राबला... वडिलांच्या निधनानंतर शिक्षण अर्धवट सोडलं... आज करोडोंची संपत्ती कमावणारा लेमन किंग कोण? जाणून घ्या लेमन किंगच्या प्रवासाबद्दल

जमीन आहे पण कोणतं पिक पिकवायचं… असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशात वातावरणात होणारे बदल आणि त्यानमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त आहे. पण तरुण शेतकरी मात्र नव्या पद्धतींचा वापर करत शेतात मोलाची भूमिका बजावत आहे…. याचं उत्तम उदाहण म्हणजे राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील संग्रामगढ गावातील अभिषेक जैन… अभिषेक जैन गेल्या अनेक वर्षांपासून लिंबूचा व्यवसाय करत कोट्यवधी रुपये कमावत आहे.
बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिषेक जैन यांनी लिंबूची सेंद्रिय शेती करून भरघोस कमाईचा सुरू केली. वडिलांच्या निधनांतर त्यांनी शेती करण्याचा निर्यण घेतला. आता शेतीतून ते मोठी कमाई करत आहेत. अभिषेक यांनी लिंबूची सेंद्रिय शेती करून भरघोस कमाईचा सुरू केली.
अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार, वर्षाला लिंबाच्या एका झाडापासून ते 150 हून अधित उत्पादन घेतात. तर सामान्यतः इतर शेतकरी एका झाडाकडून 80 किलोपर्यंतच उत्पादन मिळवू शकतात. अभिषेक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी त्यांनी सीए फाउंडेशनची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी मार्बलचा देखील व्यवसाय केला. पण वडिलांच्या निधनानंतर पश्चात शेतीची संपूर्ण जबाबदारी अभिषेक यांच्या खांद्यावर आली.
अखेर वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष शेतीकडे केंद्रित केलं. त्यांच्या वडिलांनी दोन एकरनध्ये लिंबूची बाग लावली होती. ज्यातून वर्षाला 8 – 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. पण लागवड करण्यासाठी 2.5 लाख रुपयांचा खर्च यायचा. वडिलांचा शेतीतील यशस्वी प्रवास पाहून अभिषेक याने शेतीमध्ये करीयर करण्याचा निर्णय घेतला.
उन्हाळ्यात का नाही करत व्यवसाय?
पावसाळा आणि हिवाळ्यात लिंबूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असतो.. पण उन्हाळ्यात अभिषेक उत्पादन घेणे टाळतात. कारण, राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात उत्पादन कमी मिळतं… ज्यामुळे इतर खर्च जास्त होतो… अशात त्यांनी उत्पादन व्यवस्थापनाची योग्य रणनीती आखली आहे.
अभिषेक यांनी वाढवला व्यवसाय…
वडिलांच्या दोन एकर बागेतून अभिषेक यांना चांगली सुरुवात केली आणि आता तर त्यांनी आणखी दोन एकरमध्ये लिंबूची बाग लावली आहे… आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन केल्यास सर्वात फायदेशीर व्यवसाय लिंबू ठरु शकतो… असं देखील अभिषेक म्हणाले.
