टोमॅटोनंतर सिमला मिरची रस्त्यावर, राज्य कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यातील विदारक चित्र

टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने मध्यंतरी रस्त्यावरच शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिले होते. विशेष म्हणजे राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांच्या येवल्यातीलच विंचुर चौफुलीवर शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिल्याने लाल चिखल झाला होता. अशीच काहीशी अवस्था सिमला मिरचीचीही झाली आहे.

टोमॅटोनंतर सिमला मिरची रस्त्यावर, राज्य कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यातील विदारक चित्र
सिमला मिरचीला कवडीमोल दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेकऱ्याने मिरची रस्त्यावर फेकली

नाशिक : टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने मध्यंतरी रस्त्यावरच शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिले होते. विशेष म्हणजे राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांच्या येवल्यातीलच विंचुर चौफुलीवर शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिल्याने लाल चिखल झाला होता. अशीच काहीशी अवस्था सिमला मिरचीचीही झाली आहे. मिरचीला मातीमोल बाजार दर मिळत असल्याने येवल्यातील शिमला उत्पादक शेतकऱ्याने सिमला मिरची रस्त्याच्या कडेला फेकून संताप व्यक्त केला. सिमला मिरचीला बाजारात 4 ते 5 रुपये असा दर मिळत आहे.

पिक पध्दतीमध्ये बदल करून उत्पादन वाढविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. मात्र, याला ना निसर्गाची साथ आहे ना सरकारची. असाच वेगळा प्रयोग येवल्यातील एका शेतकऱ्याने केला. यंदा टोमॅटो पाठोपाठ सिमला मिरची मध्ये शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग करून बघितले. मात्र, शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होत आहे. शिवाय कधी संततधार तर कधी जोरदार पावसामुळे शेतीमालाला अक्षरशः कवडीमोल दर मिळत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे येवल्यातील शेतकरी हवा मेटाकुटीस आला आहे. सिमला मिरची ही येवला येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेले असता अकरा किलोच्या क्रेटला 35 ते 45 रुपये इतका बाजार भाव मिळाला होता. यामुळे उत्पादनावर झालेला खर्च आणि पदरात पडत असलेल उत्पन्न याची गोळाबेरीज न करता थेट मिरची रस्यावर फेकून देणेच शेतकऱ्याने पसंत केले.

अडीच ते चार रुपये किलोला बाजार भाव मिळाल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि काढणी खर्चही निघणार नसल्याने येवला-सुकी रोडवर शिमला मिरची फेकून देत आपला संताप व्यक्त केला. शेतीमालाच्या दराची अशीच अवस्था राहिली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा आणि बँकेचे घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न आहे.

मुख्य पिकाचे नुकसान भाजीपाला कवडीमोल

पावसामुळे खरिप तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार होता तो भाजीपाल्याचा. मात्र, या भाजी-पाल्याचेही पावसाने नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर कोसळल्याने कवडीमोल दरात विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. भाजीपाल्याची वाहतू्क, काढणी, मशागत आणि बाजारात मिळत असलेला दर याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी भाजीपाला फेकून देत आहे.

सिमला मिरचीला 4 रुपयाचा भाव

बाजारपेठेत वाढत असलेली भाजीपाल्याची आवक आणि पावसामुळे झालेला परिणाम यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मध्यंतरी टोमॅटोचे दर कमा झाले होते तर आता सिमला मिरचीचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत की नाही हा प्रश्नय After tomato, capsicum on the road, a grim picture of the state agriculture minister’s district

इतर बातम्या :

साकीनाका बलात्कारप्रकरणी राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने

आधी उत्तराखंड आणि नंतर कर्नाटक, आता गुजरात, भाजपात मुख्यमंत्री बदलाची मालिका; नेमकं कारण काय काय? वाचा सविस्तर

साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं, भाजपचे औरंगाबादेत आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI