अकोल्याच्या शेतकऱ्याची कमाल, भर उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड, पीकही बहरले

योग्य नियोजनामुळे सध्या हे पीक चांगले बहरले असून परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे. (Akola farmer plants soybean during summer)

अकोल्याच्या शेतकऱ्याची कमाल, भर उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड, पीकही बहरले


अकोला : अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील तामसी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे योग्य नियोजनामुळे सध्या हे पीक चांगले बहरले असून परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे. (Akola farmer plants soybean during summer)

सोयाबीन पिकाची खरीप हंगामातील साधारणत: जून जुलै महिन्यात पेरणी केली जाते.. यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे येणाऱ्या हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन जपून ठेवावे असे आवाहन कृषी विभागाने केले होते.

उन्हाळ्यात सोयाबीनची पेरणी

त्यामुळे खरीपात पेरणीकरिता सोयाबीन बियाणे लागणार होते. या पार्श्वभूमीवर तामशी येथील शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांनी प्रयोगशीलता म्हणून उन्हाळ्यात सोयाबीनची पेरणी केली. एक आगळे वेगळे उदाहरण समोर ठेवून त्यांनी 4 एकरात हा प्रयोग केला. विशेष म्हणजे योग्य नियोजनामुळे सध्या सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे.

या पिकावर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसत नसून उत्पन्न समाधानकारक होईल. तसेच त्याला योग्य भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा उन्हाळ्यात सोयाबीन पिकाची पेरणी करून उत्पन्न घ्यावे, असे आवाहन शेतकरी गणेश काळेंनी केले आहे.

गणेश काळे यांनी 27 जानेवारी रोजी 4 एकर क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी केली होती. त्याला खत, फवारणीसह इतर मशागत योग्य प्रकारे केली आहे. त्यामुळे हे पीक चांगल्या प्रकारे बहरले आहे. त्यामुळे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी आशा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. (Akola farmer plants soybean during summer)

संबंधित बातम्या : 

उत्पादकांना खर्च-बाजारभावाचा मेळ बसत नाही, द्राक्षाच्या पंढरीत द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून 1 ते 1.25 लाख रुपयांचं अर्थसहाय्य, अर्ज कसा करावा?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI