शेतकऱ्यांसाठी ATM पेक्षा कमी नाही या फळाची शेती! खर्च कमी आणि कमाईच कमाई

Amla Farming: आवळा शेती ही कमी खर्च, कमी मेहनतीत अधिक नफा देणारी ठरते. या झाडाच्या देखभालीसाठी जास्त खर्च येत नाही. पाणी पण जास्त लागत नाही. खतं, रसायनांवर पण जास्त खर्च होत नाही. वर्षातून दोनदा लक्ष दिले तरी पुरेसे दिले तरी झाडाला चांगली फळं लागतात.

शेतकऱ्यांसाठी ATM पेक्षा कमी नाही या फळाची शेती! खर्च कमी आणि कमाईच कमाई
आवळ्याची शेती
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 14, 2025 | 11:21 AM

Amla Farming ATM: कमी खर्चात अधिक उत्पादन आणि कमाई करणारी शेती हे दिवास्वप्नच असते असे नाही. आवळ्याची शेती ही शेतकऱ्यांसाटी एटीएमपेक्षा कमी नाही. कारण एकदा झाडं लावल्यानंतर पुढील काही वर्षे ते सतत कमाई करुन देते. त्यासाठी अधिकचा खर्च ही येत नाही. आवळा शेती कमी खर्चात आणि कमी कष्टात अधिक फळ देते. या झाडाच्या देखभालीसाठी जास्त खर्चही येत नाही. पाणी पण कमी लागते. या झाडासाठी खत आणि रसायनांचा वापरही कमी होतो. झाडं जसं मोठं होतं. तशी त्याची देखभाल सुद्धा कमी होते. वर्षातून दोनदा जरी या झाडाची निगा राखली तरी चांगलं फळं येतात.

दीर्घ काळापर्यंत कमाई

आवळ्याचे पीक हे दीर्घकाळपर्यंत कमाई करुन देते. आवळ्याचे झाड 40 ते 50 वर्षांपर्यंत फळ देते. म्हणजे एकदा लावले तर विना झंझट पुढील अनेक वर्ष उत्पन्न मिळते. या झाडांवर हवामानाचा एकदम प्रतिकूल परिणाम होत नाही. हे अत्यंत मजबूत झाडं मानण्यात येतं. उन्ह,पाऊस आणि हिवाळ्याचा एकदम प्रतिकूल परिणाम होत नाही. तीनही ऋतूशी सामना करण्याची या झाडात क्षमता असते.

वर्षभर असते मागणी

बाजारात आवळ्याची वर्षभर मागणी असते. कच्चे आवळे आणि प्रक्रिया केलेल्या आवळ्यांना सतत मागणी असते. ज्युस, मुरब्बा, पाऊडर, कँडी, लोणचं आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये आवळ्याचा अधिक वापर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. पण आवळ्याची जात निवडताना काळजी घ्यावी लागते. आवळ्याच्या शेतीसाठी NA-7, NA-6 आणि चकय्या या प्रजातींना शेतकरी महत्त्व देतात. या प्रजातीची झाडं अधिक फळ देतात तसेच त्यांना कीड लागत नाही. या थोड्या हलक्या प्रतीची अथवा काळी माती चांगली असते.

आवर्षणग्रस्त भागातही शेती

ज्या भागात पाण्याची कमी आहे. म्हणजे आवर्षणग्रस्त भागातही आवळ्याची शेती होते. आवळ्याची शेती ही प्रामुख्याने सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात करण्यात येते. दोन झाडांमध्ये जवळपास 8×8 मीटरचे अंतर ठेवण्यात येते. सुरुवातीची दोन वर्षे पाणी द्यावे लागते. शेण आणि निसर्गिक खतं टाकल्यास हे झाड बहरते. या झाडाला रासयनिक खतं टाकण्याची गरज नाही. तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षी फळं यायला सुरुवात होते. एक झाड वर्षाला साधारण 40 ते 70 किलो फळं देतात. एका एकरात वार्षिक 1.5 ते 2 लाख रुपयांची कमाई आरामात होते.