AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu: योग्य भाव देता येत नसेल तर… बच्चू कडूंचा सरकारलाच घरचा आहेर, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा प्रस्ताव

Bachchu Kadu Big Statement: राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. सरकारने उपाय योजनांसाठी पावलंही टाकली आहेत.आता ठोस उपाय योजनाविषयी शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर हमीभावावरून त्यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Bachchu Kadu: योग्य भाव देता येत नसेल तर... बच्चू कडूंचा सरकारलाच घरचा आहेर, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा प्रस्ताव
बच्चू कडू, नेते, शिवसेनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 25, 2026 | 1:12 PM
Share

खेमचंद कुमावत, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : राज्य दुष्काळाच्या सावटाखाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचा धावता दौरा केला. त्यांनी बांधावर जात परिस्थिती समजून घेतली. सरकारने दुष्काळासंबंधी तातडीने उपाय योजनाही सुरू केल्या आहेत. आता ठोस उपायासंदर्भात शिंदे सेनेचे शिलेदार बच्चू कडू यांनी सरकारला एक चांगला प्रस्ताव दिला आहे. तर पिकांच्या हमीभावावरून त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ही साखळी अगोदर मोडा

शेती आता कष्टाची उरली नसून संकटाची अधिक झाली आहे. कमी पावसामुळे पिकांचे तर अतोनात नुकसान झालेच आहे, पण भविष्यात पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यावर मोठे संकट उभे राहील. गेल्या ५-६ वर्षांत एका पाण्याच्या अभावामुळे पिके हातची जात आहेत. त्यात वन्यप्राण्यांचा त्रास, बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांमधील भ्रष्टाचार अशी संकटांची साखळीच तयार झाली आहे, ती आधी मोडली पाहिजे, अशी मोठी मागणी बच्चू कडू यांनी केली.

बच्चू कडू यांची ठोस उपाय योजना काय?

पेरणीपासून ते कापणीपर्यंतची मजुरीची सर्व कामे सरकारच्या तिजोरीतून (रोजगार हमी योजनेतून मर्ज झाली पाहिजेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटेल, गावपातळीवर मजूरांना रोजगार मिळेल आणि शहरांकडे जाणारे लोंढे थांबतील. असा रीतसर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

हमीभावावरून केंद्र सरकारला सुनावले

राज्य सरकारने १५ टक्के नफा धरून कापसासाठी प्रति क्विंटल ११,००० रुपयांची शिफारस केली होती, मात्र केंद्राने केवळ ८,००० रुपये भाव दिला. म्हणजे थेट ३,००० रुपयांचे नुकसान होत असून शेतकरी तोट्यात गेला आहे असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी दिला. जर सरकारला योग्य भाव देता येत नसेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना थेट रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करावे, अशी महत्त्वाची सूचनाही त्यांनी केली.

बच्चू कडू आंदोलनाच्या पवित्र्यात

आंदोलन म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांना किंवा फडणवीस यांना विरोध करणे नव्हे. आंदोलनाचा खरा उद्देश शेतकर्‍यांचे संघटन अधिक मजबूत करणे हा आहे. आम्ही सत्तेविरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्कांच्या बाजूने ठाम उभे आहोत, हेच या आंदोलनाचे गमक आहे, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जमाफीची घोषणा

मुख्यमंत्र्यांचे आभार, हा निर्णय स्वागतार्ह आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात २ लाखांवरील कर्जासाठी ‘ओटीएस’ (एकवेळ परतफेड) न केल्यामुळे २ लाख ५ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर सुमारे ७५ हजार कोटींचे पीककर्ज आहे. सरकारने दरवर्षी अर्थसंकल्पातून २५-२५ हजार कोटी दिले, तरी राज्यातील संपूर्ण शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त होऊ शकतो, असे त्यांनी सूचवले.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असायलाच हवी, तो लोकशाहीचा आत्मा आहे. दोन आयुक्तांमधील अंतर्गत वाद नेमका कशामुळे आहे, ते चित्र अजून पूर्ण स्पष्ट झालेले नाही. पण केवळ कोणाचा राजीनामा मागून किंवा माणसे बदलून प्रश्न सुटत नाहीत; जसे लालबागच्या राजावरून गल्लीबोळात अनुकरण सुरू झाले, तसा हा राजीनाम्याचा प्रकार झाला आहे. मूळ व्यवस्था (सिस्टीम) बदलणे गरजेचे आहे, असे मोठे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

संजय राऊतांना टोला

संजय राऊत यांची ती रोजची ठरलेली ‘आकाशवाणी’ आहे. रोज त्यांना टीव्हीवर दाखवायला मीडियाचे त्यांच्यावर नेमके काय प्रेम आहे, तेच समजत नाही. ते काही राज्याचे वा देशाचे मुख्यमंत्री नाहीत. उलट त्यांची खासदारकीसुद्धा आमच्याच मतांवर निवडून आलेली आहे; मी स्वतः शिवसेनेचा नसतानाही त्यांना मतदान केले होते, असे सांगायला कडू विसरले नाही.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास