AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही कसली दुश्मनी? रात्रीतूनच केळी बागा उध्वस्त, दर वाढूनही रावेरच्या शेतकऱ्यांसमोर काय आहे समस्या?

निसर्गाचा लहरीपणा त्यात पुन्हा करप्या रोगाचा प्रादुर्भाव घटलेले दर अशा अनेक संकटानंतर आता कुठे चित्र बदलत होते. वाढत्या उन्हामुळे केळीचे दर चांगले वाढले होते. अकोला आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत दर गेले होते. असे असताना केळी उत्पादकांसमोर एक नवेच संकट उभे राहत आहेत. अज्ञात चोरट्यांकडून केळी बागा उध्वस्त केल्या जात आहेत.

ही कसली दुश्मनी? रात्रीतूनच केळी बागा उध्वस्त, दर वाढूनही रावेरच्या शेतकऱ्यांसमोर काय आहे समस्या?
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अज्ञातांकडून केळीच्या बागा उध्वस्त केल्या जात आहेत. कारवाईच्या मागणीसाठी रावेर पोलीस ठाण्यासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला होता.
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 1:11 PM
Share

जळगाव : निसर्गाचा लहरीपणा त्यात पुन्हा करप्या रोगाचा प्रादुर्भाव घटलेले दर अशा अनेक संकटानंतर आता कुठे चित्र बदलत होते. वाढत्या उन्हामुळे (Banana Rate) केळीचे दर चांगले वाढले होते. अकोला आणि (Jalgaon District) जळगाव जिल्ह्यामध्ये 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत दर गेले होते. असे असताना केळी उत्पादकांसमोर एक नवेच संकट उभे राहत आहेत. अज्ञात चोरट्यांकडून (The banana garden was destroyed) केळी बागा उध्वस्त केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून आता केळी तोडणीचे काम चालू असतानाच असे प्रकार जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वाढत आहेत. त्यामुळे अथक परिश्रम अधिकचा खर्च करुनही आता अंतिम टप्प्यात अशा प्रकारचे नुकसान होत असल्याने या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रावेर पोलीस स्टेशन समोरच ठिय्या दिला होता.

वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये होते समाधान

कधी नव्हे ते केळीचा दर 1 हजारापेक्षा अधिकवर गेला आहे. शिवाय यंदा वाढलेल्या थंडी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे मागणीत मोठी घट झाली होती. पण फेब्रुवारी पासून केळी दराचे चित्र हे बदलत आहे. 400 रुपये क्विंटलवर असलेले दर आता 1 हजारावर गेले आहेत. शिवाय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी झालेला आहे. पण हे नवेच संकट उभे राहिले आहे. अशा समाजकंटाकावर कारवाईची मागणी आहे.

शेती साहित्याचेही नुकसान

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये हे खर्ची केले आहेत. पण या अज्ञात चोरट्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे. शेतकऱ्यांचे परिश्रम, केळीवर केलेला खर्च सर्वकाही मातीमोल होत आहे. एवढेच नाही केळी उध्वस्त करुन हे चोरटे शेतीसाहित्याची मोडतोड करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून रावेर तालुक्यात हा प्रकार वाढलेला आहे. त्यामुळे केळी बागायतदार त्रस्त आहेत.

आंदोलनामध्ये लोकप्रतिनीधींचाही समावेश

अज्ञात चोरट्यांच्या या अजब प्रकारमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रावेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान, शेतकऱ्यांबरोबर खा. रक्षा खडसे तसेच स्थानिक आमदारही या आंदोलनात सहभागी झाले होते. चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त झाला तर केळीचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural University : काय सांगता? कापसाची तोडणी अन् बांधावरच होणार जिनिंग-प्रेसिंग, शेतकऱ्यांना काय फायदा?

दुष्काळात तेरावा : ‘ग्रीन गोल्ड’ने ‘ग्रेप डॅमेज’, 500 टन द्राक्ष मातीमोल..! नेमका काय प्रकार? वाचा सविस्तर

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.