AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 20वा हप्ता कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

देशभरातली शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागला आहे. हा हप्ता कधी येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 20वा हप्ता कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर
PM Kisan 20th Instalment
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 18, 2025 | 6:54 PM
Share

देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भाजपप्रणित मोदी सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागला आहे. हा हप्ता कधी येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्याला आता 4 महिने होत आले आहेत. त्यामुळे आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

20 वा हप्ता कधी मिळणार?

समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता शुक्रवारी 20 जून रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी या हप्त्याची तारीख जाहीर केली जाणार आहेत आणि त्यानंतर हप्ता जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात?

केंद्र सरकार देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता आगामी काळात 20 हप्ताही जारी केला जाणार आहे

eKYC नसेल तर पैसे मिळणार नाहीत

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. मात्र या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ओटीपी आधारित ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत.

पीएम किसान यादीत लाभार्थ्याचे नाव कसे तपासायचे?

  • सर्वप्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर ‘लाभार्थी यादी’ लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
  • सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा