AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबीची शेती : कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय

पालेभाज्यामधून तर कमी वेळेत अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या (Farmer) पदरी पडते. शिवाय याला अधिकचा खर्च होत नाही. अशा प्रकारे कोबी उत्पादनाचे आहे. कोबी आणि फुलकोबी हे हिवाळ्यात येणारे पीक आहे.

कोबीची शेती : कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 4:32 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात मुख्य पिकाबरोबरच जोडव्यवसाय आणि पालेभाज्यामधूनही (leafy vegetables) भरघोस उत्पादन घेतले जाते. पालेभाज्यामधून तर कमी वेळेत अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या (Farmer) पदरी पडते. शिवाय याला अधिकचा खर्च होत नाही. अशा प्रकारे कोबी उत्पादनाचे आहे. कोबी आणि फुलकोबी हे हिवाळ्यात येणारे पीक आहे. कोबी- फुलकोबीचा अधिकतर लागवड ही महाराष्ट्रात होते. कोबीची लागवड 7200 तर फुलकोबीची लागवड ही 7000 हेक्टरावर होत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये याची लागवड केली जाते. कमी कालावधीत अधिकचे उत्पादन यामुळे शेतकरी याकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत.

खरीप किंवा रब्बी हंगामातील पिकांना अनियमित पावसाचा परिणाम हा होतोच. पण योग्य नियोजन आणि जोपासना केली तर पालेभाज्यातील कोबी आणि फुलकोबीतून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होत आहे. लागवडीपासून कोबी दोन महिन्यात तयार होतो तर पुर्वमशागत आणि लागवडीची तयारी हा कालावधी ग्राह्य धरला तर 100 दिवसांमध्ये कोबी हा बाजारात असतो.

कोबी आणि फुलकोबी यांना थंड वातावरण हे पोषक असते. या पिकांमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, चुना, सोडियम, लोह आणि जीवनसत्त्व ‘ए’ या खनिजांनी समृद्ध आहे. त्यामुळे आहारामध्ये हे भाजीपाला पीक महत्त्वाचे आहे.

लागवडीपुर्व घ्यावयाची काळजी

हिवाळ्याच्या तोंडावर या पीकाची लागवड ही केली जाते. साधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान या दोन्ही पीकांच्या वाढीसाठी अनुकूल असते. फुलकोबी हे अधिक संवेदनशील पीक आहे. त्यामुळे हवामानानुसारच त्याची लागवड करणे आवश्यक आहे. कमी-अधिक प्रमाणात तपामान असताना लागवड केली तर त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होतो.

कोबी – फुलकोबीसाठी जमीन कशी आहे?

सर्व प्रकारची चांगली ड्रेनेज जमीन कोबीच्या लागवडीसाठी योग्य आहे. यातच हतक्या प्रतीची जमिन असल्यास ही पीके अधिक बहरतात. मात्र, आम्लयुक्त जमिनीत कोबीची लागवड चांगली नाही. या पालेभाज्यांची लागवड करण्यापुर्वी योग्य ती मशागत करणे आवश्यक आहे. अन्यथा वाढ खुंटते शिवाय उत्पादनावरही याचा परिणाम होतो.

खत आणि पाण्याचे नियोजन

लागवडीपूर्वी जमिन ओली करतानाच कोबीच्या शेतामध्ये 80 किलो ‘एन’, 80 किलो ‘पी’ याचे मिश्रण आवश्यक आहे तर लागवड झाल्यानंतर 1 महिन्याने 80 किलो ए’न’चा दुसरा दुसरा डोस आवश्यक आहे. फुलकोबीसाठी 75 किलो एन, 75 किलो एस आणि लागवडीनंतर 1 महिन्याने 75 किलो एन चा दुसरा डोस आवश्यक आहे.

मशागत

लागवडीनंतर पीक अधिक बहरात येण्यासाठी त्याची मशागत आवश्यक आहे. मातीने या पालेभाज्याची रोपे नष्ट होऊ नये म्हणून मशागत करतानाच रोपांना मातीचा आधार द्यावा. पांढरी फुलकोबीची तोडणी करण्यापुर्वी 1 आठवडा आगोदर त्याच्या आतली पाने झाकून ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा कोबीवर सुर्यप्रकाशाचा परिणाम होतो. .

उपाययोजना

या पीकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर भाज्यांमध्ये एंडोसल्फन 35 सीसी 290 मिली किंवा फॉस्फोमिडन 85 डब्ल्यूडब्ल्यूईएससी 60 मिली किंवा मॅलाथिऑन 50 सीसी 250 मिली प्रति हेक्टर 250 लिटर पाणी फवारणी करणे फायदेशीर राहणार आहे. (Cabbage Farming: Best options for farmers to produce more in less than kaladadhi)

संबंधित बातम्या :

लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र ‘जैंसे थे’

सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट

कांदा चाळ उभारणी अन् महत्व ; अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.