लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र ‘जैंसे थे’

शेतामध्ये चिखल असताना देखील पावसाच्या धास्तीने सोयाबीन काढणी ही सुरुच आहे. या काढणीचा परिणाम मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही 5 हजार क्विंटलवर गेली आहे. तर सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. (Latur Market) भविष्यात वाढणारी आवक, सोयापेंडची आयात आणि साठवणुकीत अडचण यामुळे शेतकरी मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात आणत आहे.

लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र 'जैंसे थे'
लातुर कृषी उत्पन्न बाजार समिती
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Oct 05, 2021 | 3:29 PM

लातूर : पावसाने उघडीप देताच सोयाबीन (Soyabean) काढणीला वेग आला आहे. शेतामध्ये चिखल असताना देखील पावसाच्या धास्तीने सोयाबीन काढणी ही सुरुच आहे. या काढणीचा परिणाम मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही 5 हजार क्विंटलवर गेली आहे. तर सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. (Latur Market) भविष्यात वाढणारी आवक, सोयापेंडची आयात आणि साठवणुकीत अडचण यामुळे शेतकरी मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात आणत आहे. मिळेत तो दर स्वीकरण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे.

सोयाबीन हे जरी खरीपातील मुख्य पिक असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना आता फारशी आशा राहिलेली नाही. त्यामुळे पीकावर केलेला खर्च निघाला तरी समाधान मानले जात आहे. दरवर्षी सोयाबीनवरच शेतकऱ्यांची मदार असते. यंदा मात्र, अतिरीक्त पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. काढणी कामे सुरु असली तरी पीक हे पाण्यातच आहे. शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस हा सुरुच आहे.

सोयाबीनची आवक वाढली तरी मात्र, दरावर काही परिणाम झालेला नव्हता. सोमवारी सोयाबीनला पोटलीत 5500 दर मिळाला होता तर आज (मंगळवारी) 5600 दर मिळालेला आहे. हा सर्वसाधारण दर असला तरी सोयाबीन पावसाने दर्जा हा ढासाळलेला आहे. डागाळलेले सोयाबीन कमी किमंतीमध्ये शेतकऱ्यांना विकावे लागत आहे.

उडीदाचे दरही स्थिरच

या हंगामात उडदामुळे शेतकऱ्यांने आर्थिक आधार मिळालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून बाजारात उडदाचे दर हे वाढलेले आहेत किंवा स्थिर राहिलेले आहेत. मात्र, दरामध्ये घट अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनमधून अधिकचे पैसे पदरी पडले नसले तरी उडदाने उत्पन्नात वाढ झालेली आहे. 7 हजारवरील दर आता 7400 वर गेले आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाने डागाळलेल्या उडदाची आवक झाली होती मात्र, आता दर्जेदार माल बाजारात दाखल होत असून त्याप्रमाणे दरही मिळत आहे. सोयाबीनची कसर उडदाने भरुन काढली असली तरी उडदाचे क्षेत्र कमी आहे.

सोयाबीनची आवक वाढणार

पावसाने सोयाबीनची काढणी कामे रखडलेली होती. शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीनचा दर्जा ढासळला असला तरी पुन्हा पावसाने नुकसान होऊ नये म्हणून वावरात आलेलं पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरु आहे. सोयाबीन काढणी कामाला वेग आला आहे. शिवाय भविष्यात दर वाढतील अशी परस्थिती नाही. त्यामुळे मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात आणले जात आहे. त्यामुळेच 3 हजार क्विंटल होणारी आवक मंगळवारी 5 हजारावर गेलेली होती. आवक अशीच वाढत राहिली तर दर कमी होऊ नयेत अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6450 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6400 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6350 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5200, चना मिल 4900, सोयाबीन 6150, चमकी मूग 7200 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7250 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals increased in Latur Agricultural Produce Market Committee, however, rates remainstable)

संबंधित बातम्या :

सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट

कांदा चाळ उभारणी अन् महत्व ; अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा

‘8 अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? कसा काढायचा उतारा अन् त्याचे फायदे?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें