चाळीसगाव बाजार समिती उभारणार शेतकऱ्यांच्या हिताची गुढी, निर्णय छोटाच पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा

चाळीसगाव बाजार समिती उभारणार शेतकऱ्यांच्या हिताची गुढी, निर्णय छोटाच पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा
बाजार समितीमधील वजनकाटा

काळाच्या ओघात बाजार समित्यांचा उद्देशच बदलत आहे. ज्या समित्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आल्या त्या ठिकाणीच शेतकऱ्यांच्या लूटीचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र, चाळीसगाव बाजार समितीने घेतलेला निर्णय इतर बाजार समित्यांसाठी तर प्रेरणादायी आहेच पण महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यंदाच्या गुढीपाडव्याचे मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या शेतीमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील जी फी असते ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र खराडे

|

Mar 31, 2022 | 2:05 PM

जळगाव : काळाच्या ओघात (Market Committee) बाजार समित्यांचा उद्देशच बदलत आहे. ज्या समित्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आल्या त्या ठिकाणीच शेतकऱ्यांच्या लूटीचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र, (Chalisgaon) चाळीसगाव बाजार समितीने घेतलेला निर्णय इतर बाजार समित्यांसाठी तर प्रेरणादायी आहेच पण महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यंदाच्या गुढीपाडव्याचे मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या (Agricultural goods) शेतीमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील फी असते ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाढव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हा निर्णय छोटा असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या बाजार समितीवर 18 फेब्रुवारीपासून अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीचे घटणार लाखोंचे उत्पन्न

चाळीसगाव बाजार समितीमध्ये शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. शिवाय हंगामाच्या काळात अधिकची आवक ही ठरलेलीच. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनाचे आणि मालाचे वजन केले जाते. यासाठी शेतकऱ्यांना किमान 50 आणि त्यापेक्षा अधिकही रक्क द्यावी लागत होती. पण ही जबाबदारी आता बाजार समितीने घेतली आहे. यामुळे बाजार समितीचे 6 लाखाचे उत्पन्न घटले आहे. असे असले तरी याचा ताण शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारची फी माफ म्हणजे एक प्रकारे उत्पन्नात वाढ असल्यासारखेच आहे.

वजनकाटा हा हमाल व तोलाईदारकडे हस्तांतरित

बाजार समितीच्या या निर्णयामुळे 6 लाखाचे उत्पन्न मिळणार नाही. पण प्रशासनामधील सर्वांच्या मंजूरीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतीमाल विक्रीपूर्वी जे रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती ती आता पाडव्यापासून बंद होणार आहे. 2 एप्रिल म्हणजेच पाडव्याचे मुहूर्त साधत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

‘माझी बाजार समिती’ अॅपचाही शेतकऱ्यांना फायदा

बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यापूर्वी ‘माझी बाजार समिती’ हे मोबाईल अॅप सुरु करण्यात आलेले आहे. यामुळे बाजारपेठेतील शेतीमालाचे दर काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवाय शेतीमालाची आवक, बाजारपेठेत कोणत्या शेतीमालाची आवक झाली, याची सर्व माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळत आहे.याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून योग्य दरावरच शेतीमालाची विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत आहे. बाजार समिती प्रशासनाचे लहान-मोठे उपक्रम शेतकऱ्यांसाठी चांगले उपयोगी ठरत आहे.

संबंधित बातम्या :

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’

Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें