Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी

Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी
हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही वेळेत ऊसतोड न झाल्याने करमाला तालुक्यातील शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आहे.
Image Credit source: TV9 Marathi

यंदाच्या हंगामात ऊसाला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे समोर आले आहे. पण आता शेतकरीच अशा घटना घडवून आणत आहेत. याबाबत आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती पण याबाबत करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकऱ्याने ऊस पेटवून का दिला जातो याची कथाच मांडली आहे. एवढेच नाही तर त्यांनी स्वत: 5 एकरातील ऊसाला काडी लावली आहे. यानंतर अवघ्या काही वेळात साखर कारखान्याची तोड येऊन ऊस गाळपाला घेऊन गेली.

सागर सुरवसे

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 31, 2022 | 11:45 AM

सोलापूर : यंदाच्या हंगामात (Sugarcane Fire) ऊसाला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे समोर आले आहे. पण आता शेतकरीच अशा घटना घडवून आणत आहेत. याबाबत आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती पण याबाबत  (Karmala) करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकऱ्याने ऊस पेटवून का दिला जातो याची कथाच मांडली आहे. एवढेच नाही तर त्यांनी स्वत: 5 एकरातील ऊसाला काडी लावली आहे. यानंतर अवघ्या काही वेळात (Sugar Factory) साखर कारखान्याची तोड येऊन ऊस गाळपाला घेऊन गेली. मात्र, वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाचा सांभाळ करुन अखेर शेतकऱ्यालाच तो जाळून टाकावा लागत असेल तर त्यापेक्षा दुर्भाग्य ते काय? पण अधिकचे नुकसान आणि कालावधी होऊन गेलेला ऊसा वावराबाहेर काढायचा तरी कसा म्हणून शेतकरी आता थेट फड पेटवून देऊ लागले आहेत. त्यामुळे हे प्रशासनाचे अपयश की अतिरिक्त ऊसामुळे ओढावलेली परस्थिती हे सुटणारे कोडे आहे.

शेतकऱ्याने पेटवला 5 एकरातील ऊस

ऊस लागवड करुन 18 महिने उलटले तरी ऊस फडातच आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण हा ऊस वावराच्या बाहेर काढावा तरी कसा ? हा सवाल करमाळा तालुक्यातील उमरड येथील काशिनाथ देवकते यांच्यासमोर होता. साखर कारखान्याचा सभासद असून त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली होती. शिवाय ऊसाचे पाणीही बंद होते. वाढते ऊन आणि तोडलेले पाणी यामुळे नुकसान तर होणारच होते.कारखान्याकडून ऊसतोडीसाठी कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी 5 एकरातील ऊस हा पेटवून दिला आहे. वर्षभर ऊसाची जोपासणा त्यासाठी हजारोचा खर्च करुन पुन्हा शेतकऱ्यालाच तो पेटवून द्यावा लागत असेल तर त्यापेक्षा दुर्भाग्य ते काय?

कशामुळे शेतकरी असा निर्णय घेतात?

एकतर ऊसाचा कालावधी उलटून गेलेला आहे. त्यामुळे वजनात मोठी घट होणार आहे. असे असतानाही कारखान्याची तोड येईलच असे नाही. अधिकचा कालावधी ऊस फडात उभा असल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे लागलीच तोड हवी असेल तर ऊसच पेटवून द्या असा सल्ला ऊसतोड कामगारांनी काशिनाथ देवकते यांना दिला. तरच ऊसतोड होईल असे सांगितले. त्यामुळे काशिनाथ दवकते यांनी फडातल्या उभ्या ऊसाला काडी लावली आणि गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विवंचनेत होते त्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली.

जळालेल्या ऊसालाही टनामागे 220 रुपये मोजावे लागतात

ऊस जळाल्यावर काही वेळेमध्ये त्याची तोड व्हायला हवी असा साखर आयुक्त कार्यालयाच नियम आहे. त्यामुळे किमान ऊस पेटवून दिल्यावर का होईना याचा तोड होईल एवढेच काय ते देवकते यांचे नियोजन. मात्र, यामध्येही अनंत अडचणींचा सामना त्यांना करावा. जळालेला ऊस तोडण्यासाठी देखील शेतकऱ्यास पैशाची मागणी केली जाते. आता सध्या देवकते यांना टनामागे 220 रुपये हे ऊसतोड कामगारांना द्यावे लागत आहेत. यंदा अतिरिक्त ऊसामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें