AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही

नैसर्गिक संकटाचा सामना करुन कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 10:27 AM
Share

रत्नागिरी : नैसर्गिक संकटाचा सामना करुन (Kokan Mango) कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी (Unseasonable Rain) अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान (Washi Market) वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. उत्पादनात काळाच्या ओघात वाढ होईल पण घटत्या दराचे काय? असा प्रश्न आता आंबा उत्पादकांसमोर आहे. सध्या आंब्याच्या पेटीला 1 हजार 500 ते 4 हजार 500 असा दर मिळत आहे. मात्र, हंगामाची सुरवात आणि आता मार्केटमध्ये आंबा दाखल होऊन देखील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

15 दिवसांनी वाढणार आवक

निसर्गाच्या लहरीपणावर यंदा आंब्याचा बहर राहिलेला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होताच मोहर लागला परंतु, अवकाळी पावसामुळे आलेला मोहर फळाला आलाच नाही. परिणामी मोहर कुजला होता. त्यामुळे यंदा मार्चमध्ये मिळणारे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेले आहे. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेतील आवक ही घटली आहे. बागायतदारांच्या मते 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक ही वाढणार आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ 25 टक्केच उत्पादन पदरी पडल्याचे उत्पादक संघाने सांगितले आहे.

दुष्काळात तेरावा, दरातही घट

उत्पादनात घट झाली तर दर हे वाढीव मिळतात हेच बाजारपेठेचे सूत्र आहे. पण आंब्याबाबत असे होताना पाहवयास मिळत नाही. अवकाळीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही तर आंब्याच्या दर्जावरही झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. 1 हजार 500 ते 4 हजार 500 रुपयांना आंब्याच्या पेटीची विक्री होत आहे. त्यामुळे यंदा आंब्यातून अधिकचे उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था झाली आहे. शिवाय 10 एप्रिल नंतर आवक वाढल्यानंतर दराचे काय होणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

आवकमध्ये असा झाला फरक

गतआठवड्यापर्यंत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक ही 20 ते 25 हजार पेट्यांची होती. त्यामुळे आता कुठे सर्वकाही सुरळीत होणार असे चित्र होते. पण या आठवड्याची सुरवातच चिंताजनक राहिलेली आहे. सोमवारी 29 हजार पेट्या तर मंगळावारी थेट 24 हजार पेट्यांचीच आवक झाली. नोव्हेंबरमधील मोहरला अवकाळीचा फटका बसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आगामी काळात आवक वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?

Organic Farm : केंद्र सरकारचा भर, सेंद्रीय शेतीवर, 50 हजारांची मदत अन् योजनांचाही लाभ मिळणार

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.