Organic Farm : केंद्र सरकारचा भर, सेंद्रीय शेतीवर, 50 हजारांची मदत अन् योजनांचाही लाभ मिळणार

रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. सेंद्रीय शेती हा तर केंद्र सरकारच्या अजेंड्यावरचा विषय आहे. याकरिता दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करुन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा वापर वाढत आहे.

Organic Farm : केंद्र सरकारचा भर, सेंद्रीय शेतीवर, 50 हजारांची मदत अन् योजनांचाही लाभ मिळणार
सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहे.
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 4:22 PM

मुंबई :  (Chemical Fertilizer) रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. (Organic Farm) सेंद्रीय शेती हा तर (Central Government) केंद्र सरकारच्या अजेंड्यावरचा विषय आहे. याकरिता दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करुन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा वापर वाढत आहे. यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण तर झाला आहेच पण याकरिता अधिकचे पैसेही मोजावे लागत आहेत. त्यामुळे ही योग्य वेळ आहे नैसर्गिक शेतीची आणि यासाठीच केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. आता तर या नैसर्गिक शेतीमसाठी दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.

या आहेत दोन योजना

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून 2015-16 पासून या दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक कृषी योजना आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश असणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय असणार आहेत. सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असला तरी शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा होणार आहे.

अशी ही केंद्राची भूमिका

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि 3 वर्षांसाठी तात्पुरती मदत करणार असल्याचे कृषी कल्याण मंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे हेक्टरी 31 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्याचबरोबर मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्याचे कोणतेही कर्ज, दर्जेदार बियाणे, प्रक्रिया आणि इतर कामांसाठी हेक्टरी 46 हजार 575 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी दिले जाणार आहेत.

केंद्र सरकारचे अत्याधुनिक मोबाईल अॅप

सेंद्रीय शेतीची माहिती आणि त्याचे फायदे बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने एक अॅप तयार केले आहे. यामध्ये उत्पादन, शेतीमालाचे दर आणि भविष्यातील मार्केट यासंबंधी माहिती मिळणार आहे. आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून 5 लाख 73 हजार शेतकरी हे जोडले गेले आहेत. यामध्ये किसान पोर्टल आणि त्यांच्या बायो-उत्पादनांचा तपशील अपलोड केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करणे अधिक सोईस्कर होणार आहे.

जैवक उत्पादनांच्या निर्यातीत 6 पट वाढ

सेंद्रीय पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढ केली जात आहे. असे असले तरी सध्या सेंद्रीय उत्पादनाची निर्यात न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण जगभरात भारतीय सेंद्रीय शेतीची वेगळी ओळख आहे. त्यामुळे इंडिया ऑर्गन हे ब्रॅंड सध्या जगात लोकप्रिय ठरत आहे. 2013 साली सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून 1 लाख 77 हजार टन शेतीमालाचे उत्पादन झाले होते तर यंदा ते 8 लाख 8 हजारावर पोहचले असल्याचे मंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.