AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’

गेल्या वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे.

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी 'बुरे दिन'
वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहवयास मिळत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 1:18 PM
Share

नांदेड : गेल्या वर्षभरात (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी (Unseasonal Rain) अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता (Temperature Increase) तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे. कारण नांदेडचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे केळीबागा करपून जात आहे. केळीची पाने जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण या बागा जोपासायच्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

वर्षभर सरासरी एवढाही दर नाही

केळी हे बारमाही घेतले जाणारे पीक असले तरी गेल्या वर्षभरात समाधानकारक दर मिळालेला नाही. अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली पण मागणीच नसल्याने चढे दर शेतकऱ्यांना मिळाले नाही. अवकाळीनंतर थंडीमध्येही केळीला मागणी राहिली नाही. याऊलट अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे करपा, खोडकिड या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पदरुन पैसे खर्चून शेतकऱ्यांना बागा जोपासाव्या लागल्या होत्या. आता रमजानच्या पवित्र महिन्यात केळीला अधिकचा दर मिळेल असा आशावाद होता पण वाढत्या ऊनामुळे उत्पादन तर सोडाच पण बागा जोपासाव्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

तापमान वाढीचे नवनवे उच्चांक

ऐन सुगी सुरु असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नांदेडचा पारा तर 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम उन्हाळी सोयाबीनवरही होत आहे. पिकांची वाढ खुंटली असून भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचा अंदाज आहे. वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरलंय, त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

केळीच्या मागणीत घट

निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचा दर्जाही सुधारला नाही आणि उत्पादनात घट होऊन दर मिळाले नाहीत. आंब्याप्रमाणेच आता केळीची अवस्था झाली आहे. उत्पादन घटूनही अधिकचा दर सोडा आहे त्या दरात केळीची विक्री होत नाही. रमजान महिन्यात केळीच्या मागणीत वाढ होत असते पण व्यापारीच शेतकऱ्यांकडे फिरकत नसल्याने कवडीमोल दरात केळी विक्री करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : गोठ्याला लागलेल्या आगीत मुकी जनावरेही भाजली, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर!

Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.