आढावा रब्बीचा : पीक पध्दतीमध्ये बदल, हरभराच मुख्य पीक तर ज्वारीच्या पेऱ्यात घट

आढावा रब्बीचा : पीक पध्दतीमध्ये बदल, हरभराच मुख्य पीक तर ज्वारीच्या पेऱ्यात घट
रब्बी हंगामातील ज्वारी पीक

यंदा प्रथमच राज्यात 26 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सरासरी क्षेत्राच्या 98 टक्के रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी ज्वारी आणि गव्हाला बाजूला सारत हरभऱ्याला पसंती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 28, 2022 | 7:05 AM

पुणे : पावसामुळे लांबलेल्या पेरण्या आणि त्यामध्येच वातावरणात झालेला बदल यासरख्या अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर (Rabi Season) रब्बी हंगामात सरासरीऐवढा पेरा झाला आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी अनेक बदल केले आहेत. यापूर्वी ज्वारी हे मुख्य पीक होते पण वातावरणात होत असलेले (Changes in cropping pattern) बदल आणि उत्पादनवाढीच्या अनुशंगाने (Agricultural Department) कृषी विभागाने केलेले जनजागृती अखेर कामी आली आहे. यंदा प्रथमच राज्यात 26 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सरासरी क्षेत्राच्या 98 टक्के रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी ज्वारी आणि गव्हाला बाजूला सारत हरभऱ्याला पसंती दिली आहे. पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल झाला असला तरी सध्याच्या प्रतिकूल वातावरणात उत्पादन वाढीचे मोठे अव्हान शेतकऱ्यांसमोर राहणार आहे.

ज्वारी पेऱ्यात 3 लाखाने घट तर हरभरा 26 लाख हेक्टरावर

ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. मात्र, काळाच्या ओघात हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मराठवाड्यात तर ज्वारी पेरणीमागे दुहेरी उद्देश शेतकरी साधत होते. उत्पादनात वाढ आणि कडबा म्हणून जनावरांना चारा पण प्रतिकूल वातावरण आणि पेरणी पासून काढणीपर्यंतचे परिश्रम यामुळे ज्वारीची जागा आता हरभरा हे पीक घेत आहे. त्यामुळेच यंदा सरासरी क्षेत्रापैकी 3 लाख हेक्टराने ज्वारीचे क्षेत्र हे घटले आहे तर राज्यात 26 लाख हेक्टरावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे.

राज्यातील रब्बी हंगामातील पेरणीचे चित्र

यंदा पावसामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी तब्बल 55 लाख हेक्टरावर पेरण्या ह्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 23 लाख 80 हजार हेक्टरावर हरभरा, 20 लाख 27 हजार हेक्टरावर ज्वारी, 8 लाख 75 हजार हेक्टरावर गहू, 2 लाख 63 हजार हेक्टरावर मका, 46 हजार 400 हेक्टरावर करईचे पीक घेण्यात आले आहे.

आता उत्पादन वाढीचे उद्दीष्ट

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. मात्र, अधिकचा पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याचा ठरणार होता. त्याच अनुशंगाने पिकांचा पेरा व्हावा याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेऊन हरभरा पिकाचेच अधिकचे उत्पन्न घेण्याचे अवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनीही बदल स्वीकारत ज्वारीला बाजूला करुन हरभरा पिकावरच भर दिला आहे. मात्र, पेरणी होताच पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना रब्बीतील सर्वच पिकांना करावा लागत आहे. त्यामुळे क्षेत्र तर वाढले आहे पण आता उत्पादनही वाढणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

रंगीत फुलकोबीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ अन् सर्वसामान्यांना फायदा, काय आहे कृषितज्ञांचे मत?

Cotton: हंगामाच्या सुरवातीपासून कापसाने तारले अंतिम टप्प्यात काय होणार? शेतकरी संभ्रम अवस्थेत

सोयाबीनचे दर स्थिर आता तुरीवर लक्ष, टायमिंग साधले तरच शेतकऱ्यांचा फायदा..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें