रंगीत फुलकोबीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ अन् सर्वसामान्यांना फायदा, काय आहे कृषितज्ञांचे मत?

बिहारमध्ये मात्र, रंगीबेरंगी फुलकोबीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामध्ये पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुलकोबीचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या प्रयोगाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचे सेवन केल्यास अधिकचे फायदेही आहेत.

रंगीत फुलकोबीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ अन् सर्वसामान्यांना फायदा, काय आहे कृषितज्ञांचे मत?
रंगीबेरंगी फुलकोबी
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 4:06 PM

मुंबई : काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. यामधून उत्पदानात वाढ व्हावी हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. बिहारमध्ये मात्र, रंगीबेरंगी फुलकोबीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामध्ये पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुलकोबीचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या प्रयोगाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रंगीबेरंगी (Cauliflower) फुलकोबीचे सेवन केल्यास अधिकचे फायदेही आहेत. इतर सामान्य (Yield from cauliflower) फुलकोबीच्या दरापेक्षा याची किंमत अधिक असल्याने शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी याचे प्रयोग केले असून ते यशस्वी झाल्यानंतर आता याचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. याकरिता  (Agronomist) केंद्रीय कृषी विश्व विद्यालयाचे प्राध्यापक-सह-संचालक डॉ. राजेंद्र प्रसाद, प्राध्यापक डॉ. एस. के. सिंग हे शेतकऱ्याला त्याचे महत्त्व आणि त्याची लागवड कशी करावी हे समजावून सांगत आहेत. बिहारमध्ये काही प्रगतशील शेतकरी हे पिवळ्या आणि इतर रंगाच्या फुलकोबीची शेती करीत आहेत. हे पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. मात्र, प्रयोगशील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून अशी शेती करीत आहेत. यामुळे नवनवीन बाबी समोर तर येतातच पण उत्पादनातही वाढ होते.

यंदा काही शेतकऱ्यांनी रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड केली नाही तर त्यामधून उत्पादनही घेण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे आता भविष्यात रंगीबेरंगी फुलकोबीचे क्षेत्र वाढले तरी आश्चर्य वाटायला नको.

जाणून घ्या रंगीबेरंगी फुलकोबीबाबत

पिवळा कोबी हा कॅरोटिना आहे, तर गुलाबी जांभळा कोबी अल्ंटिला आहे. डॉ.एस.के. सिंह यांच्या मते हा कोबी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत असून कॅन्सरपासून बचावासाठी त्याचं सेवन केल जात आहे. रंगीत कोबीचे बियाणे शेतकरी अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करु शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुरवातीला जर तुम्ही लागवड करणार असताल तर त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असणे गरजेचे आहे. पहिला टप्पा पार केल्यानंतर हळूहळू त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ज्याप्रमाणे आपण नियमित कोबीची लागवड करतो अगदी त्याचप्रमाणे रंगीबेरंगी कोबीची लागवड करावी लागते. काळाच्या ओघात याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे वेगळा प्रयोग करणाऱ्यांसाठी हा उत्तम मार्ग असल्याचे कृषितज्ञांनी सांगितले आहे.

रोगप्रतिकार शक्तीही वाढते

रंगीत कोबीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यात व्हिटॅमिन ‘सी’ देखील भरपूर प्रमाणात असते. बागानी कोबीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि कॅल्शियम क्लोराईड आणि पाचक प्रणाली नियंत्रित करण्यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहेत. अशा प्रकारच्या कोबीची लागवड ही ब्रिटन आणि फ्रान्समध्ये केली जात आहे. यामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे असतात.

संबंधित बातम्या :

Cotton: हंगामाच्या सुरवातीपासून कापसाने तारले अंतिम टप्प्यात काय होणार? शेतकरी संभ्रम अवस्थेत

Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर

सोयाबीनचे दर स्थिर आता तुरीवर लक्ष, टायमिंग साधले तरच शेतकऱ्यांचा फायदा..!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.