Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर

निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच रब्बी हंगामातील पिके धोक्यात आहेत. असे असतानाच कृषीपंपावरील वाढती थकबाकी यामुळे थेट वीजपुरवठाच खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुरेही संकट उभे राहत आहे. कीड-रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे तर महावितरणकडून एका कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली जात आहे.

Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:23 PM

जालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके धोक्यात आहेत. असे असतानाच (Agricultural Pump) कृषीपंपावरील वाढती थकबाकी यामुळे थेट वीजपुरवठाच खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुरेही संकट उभे राहत आहे. कीड-रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे तर महावितरणकडून एका कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली जात आहे. महावितरणच्या या धकड कारवाईमुळे (Jalna) जालना जिल्ह्यातील राजूर उपकेंद्रांतर्गत असलेल्या 30 गावांमधील तब्बल 4 हजार 200 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता 5 ऐवजी 3 हजार रुपये अदा केल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी लोकप्रतिनीधीसह शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे महावितरण काय भूमिका घेणार यावरच शेतकऱ्यांसह रब्बी हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.

नैसर्गिक संकटानंतर आता सुलतानी संकट

रब्बी हंगामातील पेरण्या होताच निसर्गाचा लहरीपणा सुरु झाला तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे कीड-रोगराई वाढत असून याचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी औषध फवारणी केल्याशिवाय पर्यायच नाही. हे कमी म्हणून की काय आता महावितरणने प्रती कृषीपंपास 5 हजार रुपये आकारले आहेत. शिवाय शेतकऱ्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता हा निर्णय झाला आहे. त्यामुळे अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पिकांना पाणी द्यावे कसे हा प्रश्न आहे शिवाय जनावरांना पाणी मिळणेही मुश्किल झाले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

म्हणून घ्यावा लागत आहे निर्णय..

घरगुती, औद्योगिक थकबाकीच्या कित्येक पटीने थकबाकी ही कृषीपंपाकडे आहे. वेगवेगळ्या योजना शिवाय सवलती देऊनही कृषीपंपाचे वीजबिल अदा करण्याकडे शेतकऱ्यांचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून असा निर्णय महावितरणला घ्यावा लागत आहे. अनेक वेळा सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई होत असल्याचे सहायक अभियंता यांचे म्हणने आहे. त्यामुळे वीजबिल अदा करुन महावितरणला सहकार्य करुन वीजपुरवठा सुरळीत करुन घेणे हाच पर्याय आहे.

5 हजाराची मागणी 3 हजारावर तोडगा

महावितरणकडून प्रती कृषीपंपासाठी 5 हजार रुपये शेतकऱ्याने अदा केले तर विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सध्याची प्रतिकूल परस्थिती पाहता शेतकऱ्यांकडून 3 हजार रुपये घेऊनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील लोकप्रतिनीधी यांनी केली आहे. मात्र, दोन दिवसांपासून कृषीपंप बंद असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचे दर स्थिरावले आता तुरीवर लक्ष, टायमिंग साधले तरच शेतकऱ्यांचा फायदा..!

Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ

Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.