Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?

वाशिम कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालानंतर जिल्ह्यातील 793 महसुली गावांची खरिपातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विशेष सुविधा मिळतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. मात्र, महिन्याच्या कालावधी लोटला तरी कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत.

Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?
खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे असे नुकसान झाले होते.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:42 PM

वाशिम : खरिपानंतर आता रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, बाधित क्षेत्रावरील नुकसान भरपाई किंवा 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या भागातील शेतकरी विशेष सवलतीपासून अद्यापही हे वंचितच आहेत. मध्यंतरी (Washim) वाशिम कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालानंतर जिल्ह्यातील 793 महसुली गावांची (Kharif Season) खरिपातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विशेष सुविधा मिळतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. मात्र, महिन्याच्या कालावधी लोटला तरी कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत. त्यामुळे (District Administration) प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आतापर्यंत कोणत्याच प्रकरची भरपाई ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे या सवलतीमध्ये सहभाग होऊनही काय उपयोग असा सूर आता शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

खरिपातील नुकसानीनंतरचा अहवाल

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सपूर्द करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 793 गावांमध्ये खरिपातील अंतिम आणेवारी ही 50 पेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार शेतकरी कुटुबांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जाणार होत्या पण महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रशासनातील एकही अधिकारी-कर्मचारी हा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेला नाही. त्यामुळे नेमके काय होणार हा प्रश्न कायम आहे.

काय सवलती मिळतात?

पैसेवारी म्हणजेच आणेवारी यावरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे गणित अवलंबून असते. समजा जिल्ह्याची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वायदा हा माफ केला जातो. कर्जवसुली थांबवली जाते. म्हणजेच सक्तीची वसुली न करता त्यांना सवलत दिली जाते. एवढेच नाही विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाते. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळण्यास शासन स्तरावर मदत होते. यावरच ओला किंवा कोरडा दुष्काळ ठरला जातो.

कशी काढली जाते आणेवारी?

आणेवारी काढण्याची महसूल विभागाची पध्दत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मंडळातील एका गावाची निवड केली जाते. या गावातील एका शेतामध्ये 10 बाय 10 मीटर आकाराचे प्लॅाट तयार केले जातात. या प्लॅाटमधले पीक कापणी करुन त्याचे उत्पन्न काढले जाते. मंडळानिहाय तालुका स्तरावर सर्व डाटा संकलन केले जाते. उत्पादकतेच्या तुलनेत उत्पन्न हे जर 50 टक्केपेक्षा कमी असले तर पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे ग्राह्य धरले जाते. खरीप हंगामातील गेल्या 10 वर्षातील उत्पादकता ही डोळ्यासमोर ठेऊन पैसेवारी ही काढली जाते.

संबंधित बातम्या :

Onion Market: ज्याच्यामुळे केला अट्टाहास त्याचीच पुन्नरावृत्ती, सोलापुरात नेमकं काय घडलं?

सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय

निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?

Non Stop LIVE Update
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.