AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा खरेदीबाबत CM फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, दर जाहीर

Onion Farmer : मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला 2-3 रुपये किलोचा भाव मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा खरेदीबाबत CM फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, दर जाहीर
Onion FarmerImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 15, 2026 | 3:33 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2-3 रुपये किलोने विकावा लागत आहे. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्यासाठी किमान भाव जाहीर करण्याची मागणी केली होती. अशातच आता मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कांदा विकत घ्या अशी विनंती मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. पुढे बोलताना फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळूनऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या संकट राज्य सरकार दूर करेल असा शब्द देतो. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना पोहोच राशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून देणार आहोत अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

शिवराज सिंह चव्हाण यांनीही दिली कांदा खरेदीची माहिती

यावेळी बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटले की, भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र दोन्हीकडे कमळ उगवले आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर दिले जाईल हा पंतप्रधानांचा मानस आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याच राज्याला 30 लाख खरं मिळाली नव्हती, मात्र महाराष्ट्राला 30 लाख घर मिळाले आहेत असं सांगताना कांद्याची खरेदी 12 रुपये 35 पैसे किमतीने सुरू केली जाईल अशी माहिती दिली आहे.

कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण

उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने येवल्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल केवळ सहाशे ते सातशे रुपये इतकाच दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये प्रतिक्विंटल 1500 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Follow Us
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?