PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त; पद्धत कशी आहे?

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 20, 2023 | 9:51 PM

तुम्ही पीएम किसान योजने अंतर्गत बँक अकाउंट नंबर बदलण्यासाठी पीएम किसानच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. काही दिवसानंतर बँक अकाउंटची माहिती दुरुस्त केली जाईल.

PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त; पद्धत कशी आहे?

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १२ किस्ती मिळाल्या आहेत. ११ व्या किस्तीच्या तुलनेत १२ व्या किस्तीत काही कमी शेतकऱ्यांना पैसे कमी मिळाले आहेत. १२ वी किस्त सुमारे ८ कोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे. किस्त न मिळण्याची काही कारणं आहेत. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही, त्यांना सरकारने मदत केली नाही. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांकडून बँक अकाउंट नंबर, आधार नंबर चुकीचे असल्याने काही जणांना पैसे मिळाले नाही. पीएम किसान पोर्टलवर काही चुकीची माहिती असेल, तर त्यात दुरुस्ती करता येते.

दुरुस्तीचे हे काम घरी बसून ऑनलाईन करता येते. बँक अकाउंट, लिंग, आधार नंबर या चुका दुरुस्त करता येतात. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे.

असा करावा ऑनलाईन अर्ज

सुरुवातीला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या वेबसाईटवर pmkisan.gov.in जावे. होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा ऑप्शन दिसेल. फार्मर्स ऑप्शनखाली हेल्प डेस्क लिहिलेलं असेल. हेल्प डेस्कवर क्लिक केल्यावर नवीन पेज दिसेल.

या पेजवर आधार नंबर, अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबरची नोंद करा. त्यानंतर गेट डाटाच्या बटनवर क्लिक करा. एक विंडो खुलेलं. तिथं तुम्हाला तुमची माहिती दिसेल. येथे ग्रिव्हन्स टाईपचा एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवर क्लिक करून जी चुक असेल, तरी दुरुस्त करता येते. त्यावर क्लिक करावं.

समजा बँक अकाउंट चुकीचा असेल, तर बँक अकाउंट नंबर चुकीचा असल्याचा ऑप्शन निवडा. डिसक्रीप्शन बॉक्समध्ये हिंदी किंवा इंग्रजीत अकाउंट नंबरची माहिती दिलेली असेल. ही माहिती भरून त्यानंतर कॅप्सा भरावा लागेल. त्यानंतर सबमीटच्या बटनवर क्लीक करावे.

काही दिवसानंतर खाता अपडेट होईल

तुम्ही पीएम किसान योजने अंतर्गत बँक अकाउंट नंबर बदलण्यासाठी पीएम किसानच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. काही दिवसानंतर बँक अकाउंटची माहिती दुरुस्त केली जाईल.

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI