Cotton crop: फरदड कापसाला एक ना अनेक पर्याय? पीक पध्दतीमधील बदलच फायद्याचा, वाचा सविस्तर

खरीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी कापूस अजूनही वावरातच उभा असून शेतकरी फरदड कापसातून उत्पन्न घेण्याच्या तयारीत आहे. परंतू, फरदड कापसामुळे शेतजमिनीचेच नाही तर आगामी हंगामातील पिकांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे फरदडचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेऊ नये असे आवाहन केले आहे.

Cotton crop: फरदड कापसाला एक ना अनेक पर्याय? पीक पध्दतीमधील बदलच फायद्याचा, वाचा सविस्तर
कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 21, 2021 | 11:52 AM

औरंगाबाद : खरीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी ( Cotton crop) कापूस अजूनही वावरातच उभा असून शेतकरी फरदड कापसातून उत्पन्न घेण्याच्या तयारीत आहे. परंतू, फरदड कापसामुळे शेतजमिनीचेच नाही तर आगामी हंगामातील पिकांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे फरदडचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेऊ नये असे आवाहन केले आहे. मात्र, योग्य पर्याय काय मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत. शिवाय रब्बीच्या पेरण्याचे हंगाम संपुष्टात आलेला आहे. असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे (summer season) उन्हाळी हंगामातील सर्वच पर्याय हे खुले असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

फरदड कापसाला अनेक पर्याय

फरदड कापसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्याही लक्षात येत आहे. मात्र, रब्बी पेरणीला झालेला उशिर आणि दुसरीकडे कापसाचेही घटत असलेले दर यामुळे शेतकरी फरदडची मोडणी करुन इतर पीक पेऱ्याच्या तयारीत आहे. सध्या महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध असून उन्हाळी सोयाबीन हे 15 जानेवारीपर्यंत पेरता येणार आहे. शिवाय खरीप हंगामात झालेले नुकसान उन्हाळी हंगामात भरुन काढण्याची चांगली संधी शेतकऱ्यांकडे आहे. कापसाचे क्षेत्र हे आता रिकामे होणार असून फरदड कापसाला उन्हाळी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे.

उन्हाळी पिकांना पोषक वातावरण अन् मुबलक पाणी

दरवर्षी केवळ पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येत नाही. पण यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. शिवाय प्रकल्पांमध्ये शेतीसाठी राखीव असणारे पाणी देण्याचा निर्णयही पाठबंधारे विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असून शेतकऱ्यांकडे उन्हाळी बाजरी, भुईमूग, सुर्यफूल, मूग, उडीद हे देखील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. सुर्यफूलाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे बियाणे मिळणे देखील मुश्किल झाले आहे. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांकडे अनेक पर्याय आहेत. मात्र, फरदड कापसामुळे नुकसान टाळण्यासाठी यापैकी कोणतेही पीक घेतले तरी फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

नेमकी बिजप्रक्रीया कशी केली जाते ?

बिजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरेदी केंद्रावर तूर विक्रीपूर्वी करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

Rabi Season : गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच कार व्यवस्थापन अन्यथा होईल उत्पादनात घट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें