पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!

वाढत्या दराला काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे. दर घटले असताना शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला तर आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने दरात वाढ होताच त्याचा फायदा साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम आणि आता वाढत असलेली मागणी यामुळे 7 हजार 500 रुपये क्विंटल असलेल्या कापसाचे दर दोन दिवसांमध्येच 9 हजारावर गेले आहेत.

पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:14 PM

परभणी : सलग दुसऱ्या दिवशी ( Cotton prices) कापसाला विक्रमी दर मिळत आहे. मंगळवारी नंदूरबार तर बुधावारी परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला 9 हजार 50 रुपये दर मिळालेला आहे. त्यामुळे (Farmer Satisfied) शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे मात्र, वाढत्या दराला काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे. दर घटले असताना शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा (Cotton Store) साठवणूकीवर भर दिला तर आता (International Market) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने दरात वाढ होताच त्याचा फायदा साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम आणि आता वाढत असलेली मागणी यामुळे 7 हजार 500 रुपये क्विंटल असलेल्या कापसाचे दर दोन दिवसांमध्येच 9 हजारावर गेले आहेत. हंगामाच्या सुरवातीलाही अशीच परस्थिती निर्माण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात होताना पाहवयास मिळत आहे.

दोन दिवसांमध्ये दीड हजाराने वाढले दर

शेतीमालाच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला 8 हजार 500 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होता. मात्र, मध्यंतरी यामध्ये अचानक घट झाली होती. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापसाचेही उत्पादन घेण्याची तयारी दाखवली होती. मागणीत घट झाल्यामुळे 9 हजारावर गेलेला कापूस थेट 7 हजार 500 वर येऊन ठेपला होता. परंतू, पुन्हा दराने उचल खाल्ली आहे. मंगळवारी नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9 हजार रुपये तर बुधवारी लागलीच परभणी जिल्ह्यातील मानवत येथे 9 हजार 50 रुपये दर मिळाला आहे, शिवाय मागणीत वाढ झाली तर अणखीन दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुतगिरण्या आणि कापड उद्योगात कापसाचा वापर वाढला

एकतर कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झालेली आहे. यातच पुन्हा अवकाळी पाऊस आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनला मोठा फटका बसलेला आहे. कॅाटन असोसिएशने यंदा 360 लाख टनाचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात 330 लाख टनापर्यंतही उत्पादन झाले नाही. शिवाय देशातील सुतगिरण्या आणि कापड उद्योगामध्ये कापसाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे मागणी वाढत असताना दुसरीकडे शेतकरी वाढीव दराच्या प्रतिक्षेत साठवणूक करीत असल्याने आता दिवसागणीस दरात तफावत दिसत आहे.

मध्यंतरी ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या मागणीत घट

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापासाची मागणी घटली होती. तर जागतिक पातळीवरील परिणाम थेट स्थानिक पातळीवरील सुतगिरण्यांवरही झाला होता. येथील गिरण्यांनीदेखील उत्पादन क्षमता कमी केली होती. याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला होता. असे असतानाही शेतकऱ्यांनी पॅनिक न होता सोयाबीनप्रमाणे कापसाचीही साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागणी नसतानाही कापसाची आवक असे चित्र झाले नाही. त्याचा परिणाम आता झाला आहे. मागणी वाढल्याने कापसाच्या दरात थेट 1 हजार 500 रुपयांनी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

Fruit Tree : मराठवाड्यातील 9 गावाच्या शिवारात 20 हजार फळझाडांची लागवड अन् संगोपनही, काय आहे हा अनोखा उपक्रम?

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.