Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 9:43 AM

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Agriculture News Today
Image Credit source: tv9marathi

अमरावती : कापसाला योग्य भाव (Fair price for cotton) मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कापूसाची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया शोधून काढत आहेत. गेल्यावर्षी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला उच्चांकी तेरा हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पाच दिवसात क्विंटलचा दर 200 रुपयाने कमी होऊन कापूस पुन्हा आठ हजार रुपये क्विंटलवर आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदाच्यावर्षी कापसाचं पीक सगळीकडं चांगलं आलं आहे. परंतु दर मिळत नसल्यामुळे नेमकं काय करावं अशी स्थिती शेतकऱ्यांच्या समोर उभी राहिली आहे.

हे सुद्धा वाचा

कापसाला भाव मिळत नसल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात केली. महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये भाव दिला होता, मात्र यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कापूस हा घरामध्ये पडून असून राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI