Cyclone Yaas: यास चक्रीवादळ शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार? नेमकं काय घडणार?

अरबी समुद्रात आलेलं तोक्ते आणि बंगालच्या उपसागरातील यास चक्रीवादळ मान्सूनवर मोठा परिणाम करण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. (Cyclone Yass Farmers)

Cyclone Yaas: यास चक्रीवादळ शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार? नेमकं काय घडणार?
Cyclone Yaas

Cyclone Yaas नवी दिल्ली: भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशाला यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात यास चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून पाऊस 21 मे रोजी बंगालची खाडी आणि अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला होता. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या वादळांमुले मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Cyclone yaas 2021 latest news live updates Monsoon may impacted due to cyclone yaas and tauktae said by meteorologists its create problems for farmers )

मान्सून प्रभावित झाल्यास शेतकऱ्यांच मोठं नुकसान

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 31 मे किंवा 1 जूनला मान्सून पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. चक्रीवादळांमुळे मान्सून पोहोचण्यास विलंब झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी खरिप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. मान्सून पाऊस विलंबानं झाल्यास पेरणी लांबू शकते परिणामी शेतीतून मिळणार्या उत्पन्नावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.

मान्सून लांबल्यास शेतकऱ्यांना चिंता का?

भारतामधील जवळपास 40 टक्के शेतकरी अजूनही मान्सूनच्या पावसाच्या भरवशावर शेती करतो. उत्तर भारतातील राज्यांमध्ये मान्सूनच्या पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची साधन असल्यानं त्यांना याचा काही फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाब, यूपी, हरियाणा, बिहारमधील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यानं त्यांचं मान्सून पावसावरील अवलंबित्व कमी झालं आहे.

ओमानमधून आले ‘यास’ वादळ

‘यास’ चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे रोजी उशिरा रात्री किंवा 26 मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.

संबंधित बातम्या:

PHOTO | ‘Yaas’ चक्रीवादळ 12 तासांत भीषण स्वरुप घेणार, कुठे मुसळधार, तर कुठे बचावकार्य वेगात

‘यास’ चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर, वेग ताशी 185 किमी, महाराष्ट्राला काय धोका?

Cyclone yaas 2021 latest news live updates Monsoon may impacted due to cyclone yaas and tauktae said by meteorologists its create problems for farmers