बोगस बियाण्यावर जालीम उपाय, सोयाबीनचं कुठलं बियाणं वापरायचं? दादाजी भुसेंचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला

बोगस बियाण्यावर जालीम उपाय, सोयाबीनचं कुठलं बियाणं वापरायचं? दादाजी भुसेंचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला
दादाजी भुसे, कृषी मंत्री

गेल्यावर्षी सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होते. Dadaji Bhuse Soybean

Yuvraj Jadhav

|

May 10, 2021 | 12:54 PM

नागपूर: कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणं पेरणीबाबत महत्वाचं आवाहन केलं आहे. खरीप हंगामातील पेरणीबाबत कृषी विभागाचं नियोजन सुरु आहे. एकाही शेतकऱ्याला बियाणं आणि खताचा तुटवडा जाणवणार नाही, असं दादाजी भुसे म्हणाले आहेत. बोगस बियाण्यांमुळं होणार नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचं घरगुती बियाणं वापरावं, असं आवाहन त्यांनी केली आहे. (Dadaji Bhuse appeal to farmers use domestic seed of Soybean for this season)

शेतकऱ्यांनी सोयाबीनचं घरगुती बियाणं वापरावं

गेल्यावर्षी सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बोगस बियाणं वापरण्याऐवजी सोयाबीनचं घरगुती बियाणं वापरण्याचा सल्ला दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला. गेल्या सहा महिन्यांपासून घरगुती बियाण्यांच्या वापराविषयी मोहीम सुरु असल्याचं दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्यात खरीप पेरणी नियोजन सुरु

कृषी विभागाकडून खरिप हंगामातील पेरणीचं नियोजन सुरु आहे. आपल्या भारतात महाराष्ट्रात कोरोनाचं मोठं संकट आहे. त्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या संकटातही शेती संबंधित बियाणं दुकानं, कंपन्या या सर्वांना निर्बंधातून वगळण्यात आलं आहे. त्यांचं काम सुरु असल्याचं दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलं.

पीक कर्जासंदर्भात दादाची भुसे काय म्हणाले?

पीक कर्ज वाटप ही दरवर्षी चालणारी प्रक्रिया आहे. या संदर्भात नव्यानं निर्देश देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. व्याज सवलतीचे निर्देश बँकांना प्राप्त झाले नसल्याचं विचारलं असता त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना 1 लाखापर्यंत आहे. ही जुनी योजना आहे. तिची मर्यादा 3 लाखापर्यंत वाढवण्यात आलीय, अशी माहिती दिली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांची कमी भासणार नाही याची दक्षता कृषी विभाग घेत आहे. बोगस बियाण्यावर धडक कारवाई करण्यात येईल, या संदर्भात कोणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

डीएपीचे दर कमी करावेत?

केंद्र सरकारनं डीएपीचे दर कमी करण्याबाबत खत उत्पादक कंपन्यांना सूचना द्याव्यात. खत उत्पादक कंपन्यानी 1200 रुपयांना विकली जाणारी डीएपीची गोणी 1900 रुपये केल्यानं शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत, असं दादाजी भुसे म्हणाले.

संबंधित बातम्या:

पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवा, राज्याची केंद्राकडे मागणी, बीड पॅटर्न नेमका काय?

गोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या!

(Dadaji Bhuse appeal to farmers use domestic seed of Soybean for this season)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें