Bhandara : पावसाचा कहर, उगवलेले धानपीकही गाळाखाली, 25 हजार हेक्टरावरील पिकांना फटका

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार होता. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच धान पिकांची लागवड उरकून उगवण होताच नुकसानही झाले आहे.

Bhandara : पावसाचा कहर, उगवलेले धानपीकही गाळाखाली, 25 हजार हेक्टरावरील पिकांना फटका
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:54 PM

भंडारा : आतापर्यंत पावसाने (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले होते पण पावसाचा असा काय कहर होत आहे की, पुरामुळे गाळही आता शेतशिवारात साचू लागला आहे. त्यामुळे उगवण झालेली पिके थेट गाळाखाली अशी स्थिती (Bhandara District) भंडारा जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सर्वकाही नुकसनीचे घडत असून हे भरुन तरी काढावे असा प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांसमोर आहे, भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून तब्बल 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे तर 100 एकरावर केवळ पुरामुळे गाळाचे अच्छादन आहे. त्यामुळे हे नुकसान भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात (Paddy Crop) भातशेतीचे क्षेत्र वाढले होते. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला होता पण निसर्गाच्या लहरीपणासमोर सर्वकाही मातीमोल होत आहे.

दोन दिवसांमध्ये 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार होता. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच धान पिकांची लागवड उरकून उगवण होताच नुकसानही झाले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मोहाडी तालुक्यात सर्वाधिक फटका

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असला तरी सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाला असे नाही. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठी तफावत आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामध्ये धान पिकाचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनही खरडून गेली आहे. संपूर्ण शेती ही रेतीमय झाली आहे. तब्बल 100 एकर शेती पुराचा गाळ आल्याने पीके गाळाली खाली आली आहे. कधी नव्हे ते हंगामाच्या सुरवातीलाच असे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी

यंदा ज्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या तुलनेत मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. कारण सध्या पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु असली तर नियम अटींवर बोट ठेवत नुकसानीपेक्षा कमी क्षेत्रावरील पंचनामे केले जात आहेत. उर्वरित भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. राज्य सरकारने मदतनिधीमध्ये वाढ केली पण त्या तुलनेत भरपाई वेळेत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.