मराठवाड्यातील स्थिती : नुकसान 8 जिल्ह्यात पंचनामे 3 जिल्ह्यातीलच पूर्ण

पावसाने खरिप हंगाम आजही पाण्यातच आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल 15 लाख हेक्टरहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. असे असताना गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यानच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावेही केली. मात्र, पंचनामे करण्याची प्रक्रीया ही धिमी असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरीत जिल्ह्यात ही प्रक्रीया अजूनही सुरुच असून प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार हा प्रश्न आहे.

मराठवाड्यातील स्थिती : नुकसान 8 जिल्ह्यात पंचनामे 3 जिल्ह्यातीलच पूर्ण
संग्रहीत छायाचित्र

लातूर : पावसाने खरिप हंगाम आजही पाण्यातच आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल 15 लाख हेक्टरहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. असे असताना गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यानच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावेही केली. मात्र, पंचनामे करण्याची प्रक्रीया ही धिमी असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरीत जिल्ह्यात ही प्रक्रीया अजूनही सुरुच असून प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार हा प्रश्न आहे.

पावसाने मराठवाड्यातील 15 लाख हेक्टरवरील पीके ही बाधित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार 67.26 टक्केवरील पीकांचे हे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याची प्रक्रीया ही कासव गतीने आहे. त्यामुळे त्वरीत प्रक्रीया पूर्ण करुन शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी आता होऊ लागली आहे. ऑगस्ट महिन्यात खरिपातील पीके बहरात असतानाच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन अशा पध्दतीने नुकसानीचे दावे केले होते. शिवाय सरसकट पीकाचे नुकसान झाले असून पंचनाम्याची औपचारिकता शासनाने करु नये अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंचनामे करण्यास सुरवात झाली असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पंचनामे हे 100 टक्के पूर्ण झालेले आहेत.

शासनाच्या वतीने पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु आहे तर दुसरीकडे दिवसेंदिवस पावसाचा जोर हा वाढतच आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याबरोबरच वाचलेल्या पिकातूनही उत्पादनात घट होणार हे नक्की.

अशी आहे पंचनाम्यांची आकडेवारी

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 34 हजार हेक्टरावरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत. सर्वात कमी औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 53 टक्केवरील पंचनामे पूर्ण झाले आहेच तर जालना 71, परभणी 61.81, नांदेड 71.46 बीड जिल्ह्यात 68.23 टक्क्यावरील पीकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर लातूर, उस्माबाद आणि हिंगोली येथील पंचनामे हे पूर्ण झाले आहेत.

आता होत असलेल्या नुकसानीचे काय?

सध्या प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याची प्रक्रीया ही सुरु असतानाच पावसाने सर्वच जिल्ह्यात हजेरी लावलेली आहे. त्यामुळे जवळपास खरीप पाण्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली असून सध्या होत असलेल्या नुकसानीचे शासन कसे मोजमाप लावणार. या नुकसानीची भरपाई मिळणार का असे सवाल उपस्थित होत आहेत.

खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान

खरिपीतील केवळ एकाच पिकाला पावसाचा फटका बसला आहे असे नाही, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. पंचनामे करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर असताना देखील पावसाने हजेरी लावल्याची अनेक प्रसंग मराठवाड्यात घडलेले आहेत.(Damage to crops in 8 districts of Marathwada, Panchnama, however, completed in 3 districts)

संबंधित बातम्या :

सामूहिक सातबाऱ्यावरील प्लॅाट विक्रीला बंदी ; मग काय पर्याय आहे, जाणून घ्या

ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र, ग्रासेवकामार्फत होणार पूर्तता

काय सांगता ? शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंत नव्हे तर 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज, लातूर जिल्हा बॅंकेची घोषणा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI