AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी नुकसानच : धावपळ करुन बाजारपेठ गाठली जे वावरात झालं नाही ते बाजार समितीमध्ये घडलं

हंगामाच्या सुरवातीपासून ते पीक काढणीपर्यंत राबायचं अन् उत्पादन पदरी पडतानाच अवकाळ गाभणं हे ठरलेलंच आहे. केवळ कांद्याच्या बाबतीतच नव्हं तर खरीप हंगामापासून सुरु झालेलं हे दुष्टचक्र अजूनही कायमच आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीने हजेरी लावली तर शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

शेवटी नुकसानच : धावपळ करुन बाजारपेठ गाठली जे वावरात झालं नाही ते बाजार समितीमध्ये घडलं
अवकाळी पावसामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेल्या कांद्याचे नुकसान झाले.
Updated on: Mar 11, 2022 | 3:51 PM
Share

सोलापूर : हंगामाच्या सुरवातीपासून ते पीक काढणीपर्यंत राबायचं अन् उत्पादन पदरी पडतानाच (Untimely Rain) अवकाळ गाभणं हे ठरलेलंच आहे. केवळ कांद्याच्या बाबतीतच नव्हं तर (Kharif Season) खरीप हंगामापासून सुरु झालेलं हे दुष्टचक्र अजूनही कायमच आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीने हजेरी लावली तर शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. छाटणी झालेल्या (Onion Damage) कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करुन शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीच्या आवारात आणला पण भल्या सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने नुकसान हे झालेच. वातावरणातील बदलामुळे शेतकरी छाटणी झाली की बाजारपेठे जवळ करीत आहे मात्र, सोलापूर बाजार समितीला लागूच ठेवण्यात आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. आवक वाढल्याने मिळेल त्या जागी कांद्याची पोती रिचवण्यात आली होती.

दरात घट अन् होणारे नुकसान वेगळेच

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे लाल कांद्यासह उन्हाळी हंगामातील कांद्याचे दर हे घसरलेले आहेत. 2600 ते 3200 रुपये क्विंटलवर असलेला कांदा आता 1000 ते 1900 प्रति क्विंटल जात आहे. यामधून झालेला खर्च तरी पदरी पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. असे असतानाच ऐन छाटणी सुरु असतानाच वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांना धडकी भरली होती. अखेर ज्याची भिती होती तेच झाले. कांद्याची विक्री होण्यापूर्वीच पावसाने गाठले आहे. त्यामुळे नुकसान तर झालेच पण आता कांदा भिजल्याने त्याची खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत.

मध्यरात्रीपासून पावसाला सुरवात

उद्या कांद्याची विक्री करायची असेल तर आदल्या दिवशीच शेतकऱ्यांना बाजारपेठ जवळ करावी लागते. कारण गेल्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक होत आहे. वेळेत कांदा दाखल झाला नाही तर सौदे होत नाहीत. त्यामुळे मध्यरात्रीच शेतकरी कांदा घेऊन आला होता. कांदा वाहनातून उतरुन खाली ठेवला की पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे हताश शेतकऱ्यास काही करताही आले नाही.

कांद्यासह रब्बीतील पिकांचेही नुकसानच

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळीची अवकृपा होत आहे. यावेळी तर तिहेरी नुकसान सुरु आहे. पावसामुळे फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा यांची काढणी सुरु असतानाच अवकाळीचा कहर पाहवयास मिळत आहे. हे कमी म्हणून की काय उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणीही सुरु झाली आहे. अवकाळी शेतकऱ्यांचे तीन प्रकारचे नुकसान होत आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

Latur Market : ढगाळ वातावरणाचा धसका, शेतीमालाचे आवक वाढली दराचे काय?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे: अखेर शेतकरी अपघात विम्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.