शेतकऱ्यांना दिलासा : ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली

30 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोंबर पर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : 'ई-पिक पाहणी'च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 5:36 PM

लातूर : एकीकडे पावसाचे थैमान असताना ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला होता. मात्र, शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोंबर पर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे.

‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्व:ता करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे.

यामध्ये अनियमितता होणार नाही. प्रशासनाशी थेट जोडणी असल्याने पीक पेऱ्याची आकडेवारी, भविष्यातील उत्पादन आणि बाजारभाव याबद्दल शेतकऱ्यांना माहिती होणार आहे. मात्र, राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यास अडसर निर्माण झाला होता. राज्यातील परस्थिती लक्षात घेता ‘ई-पिक पाहणीला 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

अशी वाढली आतार्यंत मुदत

‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याअनुशंगाने 30 सप्टेंदरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यास सुरवात होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

‘ई-पीक पाहणी’ अॅपमधील त्रुटी

1) ‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही. 2) अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नाही. अॅपमध्ये नेमकी माहिती भरायची कशी हेच शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करी आहेत. 3) यंदा अशाप्रकारे माहिती भरुन घेतली जात आहे. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार हे स्पष्ट नाही. (Deadline for crop registration extended through e-crop inspection, farmers relieved)

संबंधित बातम्या :

‘ड्रोन’ च्या वापराने शेती क्षेत्राला मिळणार चालना, डिजीटल कृषी मिशनवर लक्ष केंद्रीत करा : कृषीमंत्री तोमर

उशीरा पेरणी झालेले सोयाबीन पडेल पदरात, काढणीची अशी घ्या काळजी

व्यथा शेतकऱ्यांच्या : पाऊस अन् पुरामुळे कांद्याचा ‘वांदा’ ; लागवडीपूर्वीच रोप उध्वस्त

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.