Agricultural Awards : महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या ऋणात, कोरोना काळातील दाखले देत मुख्यमंत्र्यांकडून बळीराजाचे कौतुक

कोरोनाचे संकट हे प्रत्येक क्षेत्रावर होते. असे असताना केवळ शेती व्यवसायाने सर्वांनाच तारले आहे. केवळ उत्पादनच नाही तर या दोन वर्षाच्या काळाच विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे आज राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक चक्र सावरण्याचे काम हे शेतकऱ्यांनी केले आहे.

Agricultural Awards : महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या ऋणात, कोरोना काळातील दाखले देत मुख्यमंत्र्यांकडून बळीराजाचे कौतुक
नाशिक य़ेथे राज्य कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 1:42 PM

मुंबई : शेती व्यवसाय हा भारतीय (Backbone of the economy) अर्थव्यवस्थेचा कणा आहे याचा प्रत्यय दरम्यानच्या कोरोना काळात सबंध जगाला आलेला आहे. सर्वांप्रमाणे शेतकऱ्यांनीही वर्क फ्रॉम होम असेच केले असते तर कोरोनापेक्षा भुकबळीचे संकट ओढावले असते. प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादनात वाढ झाली असून अशा (Farmer) अन्नदात्यांचा सन्मान करायला मिळणं हेच आमचं भाग्य असल्याचे प्रतिपादन (CM Udhav Thakre) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. सन 2017, 2018 आणि 2019 या 3 वर्षांचे कृषी पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषिरत्न, कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण  पुरस्कारांसह इतर कृषी पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री हे दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अन्न देवतेमुळेच महाराष्ट्र सावरला

कोरोनाचे संकट हे प्रत्येक क्षेत्रावर होते. असे असताना केवळ शेती व्यवसायाने सर्वांनाच तारले आहे. केवळ उत्पादनच नाही तर या दोन वर्षाच्या काळाच विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे आज राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक चक्र सावरण्याचे काम हे शेतकऱ्यांनी केले आहे. शेतकरी आनंदी आणि सुखी असला तरच देश समृध्द आणि वैभवशाली होईल असाही विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य केवळ शेतकऱ्यांमध्येच

शेतकऱ्यांनी संकटाचा सामना केल्यामुळे हे शेतकरी आज पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शेती केवळ निसर्गावर अवलंबून असतानाही शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि परिश्रामाची जोड यावरच उत्पादन वाढत आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणाचा सामना अधिक करावा लागला आहे. असे असले तरी उत्पादनात घट होऊ देलेली नाही. खऱ्या अर्थाने संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य हे शेतकऱ्यामध्येच असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुरस्काराच्या स्वरुपात होणार बदल!

शेती व्यवसयात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. मात्र, पुरस्काराचे रक्कम ही गौण आहे पण आजच्या हिशोबाने ती खूप कमी आहे. त्यामुळे स्वरुपात बदल करण्याचे संकेत यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पुरस्काराची रक्कम गौण आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल यातून मोजताच येत नाही. अस असलं तरी विभागाने सुधारित रकमेसाठी प्रस्ताव पाठवावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला केले आहे.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे,संदीपान भुमरे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह विभागाचे सचिव एकनाथ डवले, पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्याचे प्रतिनिधी आणि अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.