AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीची होणार नोंदणी, शेतकऱ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय

'ई-पीक पाहणी' प्रणाली सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांनाच पीकपेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. गत खरिपापासून ही प्रणाली राबववी जात आहे. खरीप हंगामात राज्यभरातील जवळपास 84 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची नोंदणी केली होती. आता 'ई-पीक पाहणी'करतानाच शेतकऱ्यांना उभ्या पिकाची छायाचित्र तसेच या पिकाची खरेदी केंद्रावरच विक्री करायची या संबंधी सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे पिकांची नोंद आणि खरेदीची नोंदही होणार आहे.

E-Pik Pahani : 'ई-पीक पाहणी'तूनच आता खरेदीची होणार नोंदणी, शेतकऱ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय
'ई-पीक पाहणी'या अॅपमध्येच खरेदी नोंदणी हा पर्याय खुला केला जाणार आहे.
| Updated on: Mar 21, 2022 | 9:38 AM
Share

पुणे :  (E-Pik Pahani)’ई-पीक पाहणी’ प्रणाली सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांनाच पीकपेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. गत खरिपापासून ही प्रणाली राबववी जात आहे. खरीप हंगामात राज्यभरातील जवळपास 84 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची नोंदणी केली होती. आता ‘ई-पीक पाहणी’करतानाच शेतकऱ्यांना उभ्या पिकाची छायाचित्र तसेच या पिकाची खरेदी केंद्रावरच विक्री करायची या संबंधी सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे (Record of crops) पिकांची नोंद आणि खरेदीची नोंदही होणार आहे. सध्या  (Rabi Season) रब्बी हंगामात ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमाला अत्यंल्प प्रतिसाद मिळालेला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा शिवाय खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास त्याची सोयही आता ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अॅपमध्येच असणार आहे. अशाप्रकारे नोंदणी सुरु झाल्यास शेतकऱ्यांच्या दोन अडचणी ह्या दूर होणार आहेत.

अॅपमध्ये होणार हे बदल

सध्या ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून केवळ पिकांची नोंदणी केली जात आहे. यानंतर जर पिकाचे नुकसान झाले तर मात्र, पुन्हा पंचनामा करावाच लागतो आणि आर्थिक मदतीसाठी पुर्वसुचना ह्या संबंधित विभागाकडे द्याव्याच लागतात. पुर्वसुचना किंवा पंचनाम्याची सुविधा ही या अॅपमध्ये नाही. पण आता नुकसान होताच पिकाचा फोटो अपलोड करण्याची सुविधा ही याच अॅपमध्ये दिली जाणार आहे.

खरेदीच्या नोंदणीचीही सुविधा

शेतकऱ्यांना जर शेतीमाल हा खरेदी केंद्रावर विक्री करायचा असेल तर महसूल विभागाकडून ‘ई-पीक पाहणी’ अॅपवर भरलेल्या माहितीचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, या अॅप नोंदणीची सुविधा नाही. त्यामुळे आता समजा हरभरा पीकाची ‘ई-पीक पाहणी’ करुन झाली की लागलीच शेजारी असलेल्या नोंदणी बदणाला क्लिक करुन खरेदीसाठीची नोंदणीही शक्य होणार आहे. त्यामुळे पुन्हा त्यासाठी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या या प्रणालीबाबत चाचण्या घेतल्या जात आहेत.

‘ई-पीक पाहणी’साठी 31 मार्च हीच ‘डेडलाईन’

‘ई-पीक पाहणी’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची नोंद करावी म्हणून आतापर्यंत 3 वेळा वाढीव मुदत दिली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी पूर्वीच्या पध्दतीनेच होणार आहेत. आता हंगामाच अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 31 मार्च हीच पीक नोंदणीसाठीची अंतिम मुदत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनाच ‘ई-पीक पाहणी’ची प्रक्रिया पूर्ण करायची असली तरी याची जबाबदारी ही संबंधित तलाठ्यावर सोपवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खरिपात खत टंचाई अटळ, आता युरिया उत्पादनात वाढ हाच पर्याय..!

Green Fodder : उन्हाळ्यात चवळी चारा पिकाचा आधार, हिरवा चारा अन् दूध उत्पादनातही वाढ

PM Kisan Yojna : अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर Zero Balance, योजनेतील निधीची वसुली करायची कशी ?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.