मशागत करताना औतासमोर शेळ्यांचा कळप आला अन् दुर्घटना घडली…

शेती मशागतीचे काम सुरु असताना अचानक शेळ्यांचा कळप औताच्या समोर आला बैल हे गांगारुन गेले. उधळलेली बैलं थेट लगत असलेल्या विहीरीतच पडली यामध्ये या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. आगोदरच खरीपातील पीकाचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरी पडलेले नाही. त्यात ही धोंड म्हणजे दुष्काळात तेरावा अशीच शेतकऱ्याची स्थिती झाली आहे.

मशागत करताना औतासमोर शेळ्यांचा कळप आला अन् दुर्घटना घडली...
आंबाजोगाई तालुक्यात विहीरीत पडून बैजोडीचा मृत्यू

बीड : मध्यंतरी वादळी वारे आणि वीज कोसळून अनेक जनावरे ही दगावलेली होती. पण आंबाजोगाई येथे बैलजोडीच्या मृत्यूला शेळ्याच कारणीभूत ठरल्या आहेत. शेती मशागतीचे काम सुरु असताना अचानक शेळ्यांचा कळप औताच्या समोर आला बैल हे गांगारुन गेले. उधळलेली बैलं थेट लगत असलेल्या विहीरीतच पडली यामध्ये या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. आगोदरच खरीपातील पीकाचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरी पडलेले नाही. त्यात ही धोंड म्हणजे दुष्काळात तेरावा अशीच शेतकऱ्याची स्थिती झाली आहे.

आंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे शेतकरी पांडूरंग नामदेव आकाते हे रब्बी हंगामाच्या अनुशंगाने मशागतीचे काम करीत होते. पावसाने उघडीप दिल्याने ते शेतात कुळवणी करीत होते. दरम्यान, अचानक शेळ्यांचा कळप त्यांच्या औताच्या समोरच आला. हे पाहून औताला जुंपलेली बैलं ही गांगारुन गेली. उधळलेली बैलं ही थेट लगत असलेल्या विहिरीतच पडली. शेतकरी पांडूरंग यांनी आरडाओरड केली. शेजारचे शेतकरी एकवटले मात्र, या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. अल्पभुधारक पांडूरंग हे रब्बी हंगामाची तयारी करीत होते. खरीपात तर पीकाचे नुकसान झालेच होते पण आता बैलजोडीच गेल्याने त्यांचा आधार तुटला आहे.

औतासह बैलजोडी विहीरीत

गुरुवारी दुपारी पांडूरंग आकाते हे कुळवणीचे काम करीत होते. मात्र, अचानक शेळ्या-मेंढ्याचा कळपच त्यांच्या औताच्या समोर आल्याने बैल घाबरले. औताला जुंपले असताना त्यांनी औतासह पळ काढला आणि लगतच असलेल्या विहिरीत औतासह बैल पडले. शेजारच्यांना बोलावून त्यानी बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण औत आणि त्याखाली बैलं असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

आता शेती करायची कशी?

या बैलजोडीच्या आधारेच पांडूरंग हे शेतीची मशागत, पेरणी ही कामे करीत होते. मात्र, अचानक दोन्हीही बैलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने शेती कामे करावित कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. रब्बी हंगामातील मशागत, पेरणी ही कामे अजूनही बाकी आहेत. यातच ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लाळ्या-खुरकूताने 100 जनावरे दगावली

सध्या लाळ्या-खुरकूताचा संसर्गजन्य आजार वाढत आहे. सांगली जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात आतापर्यंत लहान-मोठी 100 जनावरे ही दगावलेली आहेत. ऐन हिवळ्यात या साथीला सुरवात होते. यापूर्वी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात लसीकरण केले जात होते. पण कोरोनाच्या काळात लसीकरण मोहिमही थंडावली होती. आता सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि भिंगेवाडी येथे जनावरांचा या आजाराने मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे ज्या भागात लाळ्या-खुरकूतचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याठिकाणपासून 5 किमी अंतरापर्यंतच्या जनावरांना लसीकरण केले जात असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. किरण पराग यांनी सांगितले आहे. (Farmer’s bull pair dies after falling into well, incident in Ambajogai taluka)

संबंधित बातम्या :

सलग दोन दिवस बाजार बंद नंतर काय आहे सोयाबीनचा दर ? आवक मात्र विक्रमी

द्राक्षे पिकावर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना

यंदा हरभरा क्षेत्रात दुपटीने होणार वाढ, काय आहेत कारणे ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI