AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : शेतकऱ्यांच्या पोरांचा नादच खुळा, आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी लावले सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे, आमरण उपोषणची जिल्हाभर चर्चा

माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषद समोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषनाला बसले आहेत.गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असून याबाबत अद्याप कसलीच कारवाई झाली नाही याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्‍यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

Beed : शेतकऱ्यांच्या पोरांचा नादच खुळा, आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी लावले सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे, आमरण उपोषणची जिल्हाभर चर्चा
बीड येथील जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांच्या मुलांना राजकीय नेत्यांचे मुखवटे घालून आंदोलन केले.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 12, 2022 | 3:34 PM
Share

बीड : सरळ मार्गाने न्याय मिळत नसेल तर कोण, कधी काय करेल याचा नियम नाही. आता माजलगाव तालुक्यातील दोन गावच्या (Grampanchayat) ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावच्या (Farmer Child) शेतकऱ्यांच्या मुलांनी केला आहे. एवढेच नाही तर कारवाईसाठी या मुलांनी जिल्हा परिषदेसमोर 4 दिवसांपासून आमरण उपोषणही सुरु केले आहे. एवढे करुनही उपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या मुलांनी थेट सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे घालून आंदोलनाला सुरवात केली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यापासून ते (Beed) बीड मधील स्थानिक आमदार यांचा मुखवटा देखील या उपोषणकर्त्यांनी घा्तला होता. उपोषणाकडे लक्ष दिले जात नसल्याने त्यांना केलेल्या या अनोख्या पध्दतीमुळे हे आमरण उपोषण आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. असे करुनही मागण्या मान्य होतात की नाही हे पहावे लागणार आहे.

नेमके प्रकरण काय ?

माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषद समोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषनाला बसले आहेत.गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असून याबाबत अद्याप कसलीच कारवाई झाली नाही याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्‍यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

मुखवट्यावर ‘ही’ राजकीय मंडळी

गेल्या चार दिवसांपासून लोणगाव आणि नित्रुड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी या 2 गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या पोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांचे मुखवटे परिधान केले होते. या अनोख्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात एकच चर्चा झाली आहे. जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...