Success Story : खडकाळ माळरानावर बहरतेय फणसाची बाग, अथक परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड

शेती आहे म्हणून करयाची नाही तर त्यामधून उत्पादकता वाढवून आर्थिक सुबध्दा साधली जावीच असाच अट्टाहास आता शेतकरी करीत आहेत. मधुकर शंकर सज्जन यांनी तर 7 वर्षापूर्वीच भविष्याचा वेध घेत थेट फणसाची लागवड केली होती. आता फणसाला फळधारणीही होऊ लागली आहे. योग्य निगा, पाण्याचे व्यवस्थापन नीट केले तर फणसाची शेती मराठवाड्यात देखील करण शक्य असल्याचे या बागेकडे पाहून स्पष्ट होते.

Success Story : खडकाळ माळरानावर बहरतेय फणसाची बाग, अथक परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड
नांदेड जिल्ह्यातील शेत शिवारामध्ये फणस शेती बहरली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 12:22 PM

नांदेड : केवळ पारंपरिक पध्दतीने शेती व्यवसाय केला तर कुटुंबाची गरज भागते मात्र, आत्याधुनिकतेची कास आणि त्याला नियोजनाची जोड दिली तर काय होऊ शकते हे (Nanded District) नांदेड जिल्ह्यातील सुजलेगांवच्या माळरानावरील बहरत असलेल्या (Jackfruit Garden) फणसाच्या बागेकडे पाहिल्यावर लक्षात येईल. नगदी पिके हे हंगामीच असतात पण दूरदृष्टी ठेऊन घेतलेल्या (Production) उत्पादनाचा आज मधुकर शंकर सज्जन यांना मोठा फायदा होत आहे. त्यांनी माळरानावर फणसाची लागवड केली होती. गेल्या 6 ते 7 वर्षापासून ते ही बाग जोपासत आहेत. त्याचे फलीत त्यांना यंदा मिळाले आहे. विशेष म्हणजे फणस हे कुण्या बाजारपेठेत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही तर लगतच्या शहरतील नागरिके हे थेट शेताच्या बांधावर येऊन फणसाची खरेदी करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे मागणी अधिक असल्याने एक फणस जवळपास 200 रुपयांना विकले जात आहे.

योग्य नियोजनामुळे शक्य

शेती आहे म्हणून करयाची नाही तर त्यामधून उत्पादकता वाढवून आर्थिक सुबध्दा साधली जावीच असाच अट्टाहास आता शेतकरी करीत आहेत. मधुकर शंकर सज्जन यांनी तर 7 वर्षापूर्वीच भविष्याचा वेध घेत थेट फणसाची लागवड केली होती. आता फणसाला फळधारणीही होऊ लागली आहे. योग्य निगा, पाण्याचे व्यवस्थापन नीट केले तर फणसाची शेती मराठवाड्यात देखील करण शक्य असल्याचे या बागेकडे पाहून स्पष्ट होते.या शेतकऱ्याच्या बागेत येऊन लोक फणसाची खरेदी करतात, त्यातून फणसाच्या या बागेतून चांगले उत्पन्न होत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

रोख पैसे अन् जागेवर विक्री

उत्पादन वाढले तरी त्याला चांगली बाजारपेठ मिळणेही तेवढेच महत्वाचे आहे. पण मधुकर शंकर सज्जन यांना बाजारपेठतही जाण्याची गरज भासलेली नाही. कारण ग्राहक थेट शेताच्या बांधावरच येऊन खरेदी करीत आहेत. आकाराने लहान असलेल्या फणसाला 100 रुपये तर मोठ्याला 200 रुपये असा दर मिळत आहे. साधारणत : लागवडीनंतर 10 वर्षांनी फळधारणा होत असते पण यांनी योग्य नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन करुन फणसशेती ही मराठवाड्यातही बहरु शकते याचे उत्तम उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.

उत्पादन वाढीचे हे आहे गुपित

खडकाळ जमिनक्षेत्र आणि वाढीव उत्पन्न हे जरा वास्तविक वाटत नाही पण सज्जन यांनी हे करुन दाखविले आहे. फणसाचे उत्पादन पाहिजे असेल तर पाण्याची कमी पडू द्यायची नाही हे सज्जन यांनी ठरवून घेतले होते. त्यामुळेच 24 तासातुन एकदा पाणी दिले जात होते. शिवाय झाडांची संख्या अधिक नसल्याने त्याची योग्य प्रकारही निगराणी करता येते. योग्य वेळी पाणी दिल्यानेच फळधारणेत वाढ झाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.