शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

दोन दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची नोंदणी ही या माध्यमातून केलेली होती. आता ‘ई-पिक पाहणी' च्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे केवळ दोन दिवसांचा कालावधी आहे. 15 ऑक्टोंबर ही शेवटची मुदत असून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली 'ई-पिक पाहणी'च्या माध्यमातून नोंदणी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 1:49 PM

लातूर : ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतामधील पीकांची नोंद थेट शासन दरबारी होणार आहे. (E-Pik Pahani) त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या पीकाची (Farmer) किती लागवड केली आहे याची तर माहिती होणारच आहे. शिवाय विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही प्रक्रीया उपयोगी ठरणार आहे. 15 ऑगस्ट रोजी या मोहिमेला सुरवात करण्यात आली होती.

सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असले तरी अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग हा नोंदवलेला आहे. कारण दोन दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची नोंदणी ही या माध्यमातून केलेली होती. आता ‘ई-पिक पाहणी’ च्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे केवळ दोन दिवसांचा कालावधी आहे. 15 ऑक्टोंबर ही शेवटची मुदत असून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.

‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ही स्व:ताच करायची आहे. त्यामुळे कारभारात तत्परता येणार असून विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोईस्कर होणार आहे. या मोहिमेच्या सुरवातीला अनेक शेतकरी नेते, संघटना यांनी विरोध केला होता. मात्र, महत्व लक्षात येताच सहभाग वाढत आहे. तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याकरिता महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी हे जनजागृती करीत असल्याने शेतकऱ्यांचा सहभाग हा वाढलेला आहे.

अशी वाढली आतार्यंत मुदत

‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याअनुशंगाने 30 सप्टेंदरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यास सुरवात होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. आता यामध्ये काय वाढ होणार का हे पहावे लागणार आहे.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे. (Farmers should participate in the final stage with the help of ‘e-crop inspection’)

संबंधित बातम्या :

रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांची कृत्रिम टंचाई ; शेतकऱ्यांच्या समस्या कायम

साखरेच्या प्रत्येक पोत्यातून होणार आता सरकारी रकमेची वसुली, कारखान्यांकडे कोट्यावधींची थकबाकी

‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, व्यापाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनाच पत्र

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.