AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खरिपात सोयाबीन अन् कापसावरच राहणार भर, प्रतिकूल परस्थितीमध्येही अन्नधान्य उत्पादनात वाढ

उन्हाळी हंगामातील कापूस वगळता इतर पिकांची काढणी झालेली आहे. एवढेच नाही तर आता खरिपात उत्पादन कसे वाढवायचे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी शिवारनिहाय मार्गदर्शन करीत आहेत. पेरणीपूर्वी नांगरण, कोळपणी, मोगडा यासारखी कामे आटोपून घेतली जात आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली असून आता प्रतिक्षा आहे ती पावसाची.

Kharif Season : खरिपात सोयाबीन अन् कापसावरच राहणार भर, प्रतिकूल परस्थितीमध्येही अन्नधान्य उत्पादनात वाढ
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 20, 2022 | 4:23 PM
Share

मुंबई : सध्या शेतशिवारात केवळ (Agricultural cultivation) शेती मशागत आणि बांधबंधिस्तीची कामे सुरु आहेत. (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे ते यंदाच्या हंगामातील पीक पध्दतीवर. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन की कापूस अशीच स्थिती शेतकऱ्यांची होणार आहे. याकरिता या दोन्ही पिकांचे विक्रमी दर कारणीभूत ठरणार आहेत. असे असले तरी (Agricultural Department) कृषी विभागाने वर्तवलेला अंदाज तेवढाच महत्वाचा असून यंदाही खरिपात सोयाबीनचीच सरशी राहणार आहे. त्याचअनुशंगाने शेतकऱ्यांची वाटचाल असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यात 46 लाख हेक्टरावर सोयाबीन तर 42 लाख हेक्टरावर कापसाचा पेरा होईल असा अंदाज आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. त्याला निसर्गाची साथ मिळाल्यावर उत्पादनात अधिकची भर पडणार आहे.

खरिपाची तयारी अंतिम टप्प्यात आता वेध पावसाचे

उन्हाळी हंगामातील कापूस वगळता इतर पिकांची काढणी झालेली आहे. एवढेच नाही तर आता खरिपात उत्पादन कसे वाढवायचे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी शिवारनिहाय मार्गदर्शन करीत आहेत. पेरणीपूर्वी नांगरण, कोळपणी, मोगडा यासारखी कामे आटोपून घेतली जात आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली असून आता प्रतिक्षा आहे ती पावसाची. शिवाय 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले होते.पिकाचे एकूण 165.02 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 39 टक्के वाढ झाली आहे. खरीप हंगाम 2021-22 मध्ये अन्नधान्य 81.60 लाख टन, खरीप गळीतधान्य 56.71 लाख टन, कापूस 71.20 लाख गाठी व ऊस 1139.33 लाख टन इतके उत्पादन झाले आहे.

कापसाला विक्रम, शेततकऱ्यांचा भऱ मात्र सोयाबीनवरच

कापसाला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदाच्या खरिपात लागवड वाढणार यामध्ये शंका नाही. कापूस आता मराठावाड्यातून कमी होत असतानाच यंदाच्या वाढत्या दराचा परिणाम थेट लागवडीवर होणार आहेत. सोयाबीन आणि कापसामध्ये लागवड क्षेत्रावरुन स्पर्धा होत असली तरी शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवरच राहणार आहे. पेरणी पासून काढणीपर्यंत कमी खर्च आणि अधिकचे उत्पादन यामुळे शेतकरी कापसाला प्राधान्य देत आहे.

अन्नधान्य उत्पादनात वाढ

गतवर्षीच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही उत्पादनात वाढ झाली आहे. सरासरीच्या 39 टक्के वाढ झाली आहे. अन्नधान्याबरोबरच खरीप गळीत हंगाम 56.71 लाख टन, कापूस 71.20 लाख टन तर उसाचे उत्पादन 1139.33 लाख टन इतके झाले आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा असला तरी उत्पादनामध्ये वाढ झाली ही बाब शेतकऱ्यांसाठी गर्वाची आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.