AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात फळ आणि मसाल्याच्या बागा लावण्यासाठी अनुदान मिळणार

या राज्यात फळ आणि मसाल्याच्या बागा लावणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. सरकारने त्यासाठी खास बजेट जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात फळ आणि मसाल्याच्या बागा लावण्यासाठी अनुदान मिळणार
rajsthan government yojanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2023 | 4:35 PM
Share

मुंबई : पारंपारिक शेती करीत असताना अधिक फायदा होत नाही, त्यामुळे देशातील शेतकरी (farmer news) अधिक चिंतेत असल्याचे पाहायला मिळतात. या राज्यात शेतकऱ्यांनी पर्यायी मार्गाकडे वळण्यासाठी सरकारने (rajsthan government yojana) नवी योजना आणली आहे. राजस्थान राज्यात शेतकऱ्यांनी चांगली आणि फायद्याची शेती करावी यासाठी गहलोत सरकार शेतकऱ्यांना फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. या राजस्थानच्या मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot) यांनी 23.79 करोड रुपयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

इतर अनुदान मिळणार

राजस्थान राज्यात 2023-24 या वर्षात फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍यांना मोठं अनुदान देणार आहे. 7609 हेक्‍टरसाठी 22.40 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे त्याचं बरोबर २५२७ हेक्टर क्षेत्रात मसाला शेतीसाठी १.३९ कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये शेतकरी कल्याण निधीतून 17.24 कोटी रुपये दिले जाणार आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून साडेसहा कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

राजस्थानमध्ये मागच्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना मसाला शेतीसाठी अनुदान दिलं जातं. विशेष म्हणजे मसाला लागवडीसाठी संबंधित विभागाकडून तांत्रिक मदत सुध्दा केली जाते. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर ४ हेक्टर आणि कमी कमी 0.5 हेक्टर शेतीसाठी अनुदान घेऊ शकता.

या भागात मसाल्यांच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर एकूण खर्च १३,७५० रुपये निश्चित करण्यात आला आहे, ज्यावर ४०% अनुदान म्हणजेच ५,५०० रुपये प्रति हेक्टर मिळू शकतात.

इथे अर्ज करा

अनुदानसाठी अर्ज करताना ई-मित्र केंद्र, राजकिसान साथी पोर्टल इथं सुध्दा तुम्ही अर्ज करु शकता. त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचं आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.