मोठी बातमी, 22 लाख शेतकऱ्यांकडून केंद्राची 43 हजार कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी

केंद्र सरकारनं 43 हजार 916.20 कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी केली आहे. ( Government MSP Procurement )

मोठी बातमी, 22 लाख शेतकऱ्यांकडून केंद्राची 43 हजार कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी
गहू खरेदी

नवी दिल्ली: शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी केली जातेय. आअंतर्गत 26 एप्रिल 2021 पर्यंत 43 हजार 916.20 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. तर, किमान आधारभूत किमतीला 232.49 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 22 लाख 20 हजार 665 शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय. (Central  Government buy wheat 22 lakh farmers have got 43000 cr as MSP through wheat procurement)

कापूस खरेदी देखील सुरु

किमान आधारभूत किमंत योजनेद्वारे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक राज्यामध्ये कापूस खरेदी सुरु आहे. 26 एप्रिलपर्यंत 18 लाख 86 हजार 498 शेतकऱ्यांकडून 26 हजार 719 कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर, किमान आधारभूत किमतीला 91 लाख 89 हजार 310 गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे.

धानाची खरेदी सुरु

धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 26 एप्रिलपर्यंत 710.53 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 702.24 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 8.29 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीला 106.35 लाख शेतकऱ्यांकडून 1 लाख 34 हजार 148 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.

डाळीची रेकॉर्ड ब्रेक खरेदी

सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 5 लाख 97 हजार 914 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 3 लाख 75 हजार 316 शेतकऱ्यांकडून 3 हजार 137.88 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे.

संबंधित बातम्या:

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ

(Central  Government buy wheat 22 lakh farmers have got 43000 cr as MSP through wheat procurement)