आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो ‘हा’ पंचसुत्री कार्यक्रम राबवा अन् आंब्याचा मोहोर वाढवा

अता जिल्ह्यासह कोकणातही वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. यामध्ये फवारणीच्या माध्यमातून किडरोगराईचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले तर आंब्याला मोहोर लागणार आहे.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो 'हा' पंचसुत्री कार्यक्रम राबवा अन् आंब्याचा मोहोर वाढवा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 1:18 PM

पालघर : मध्यंतरीचा (Untimely Rains) अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्वाधिक नुकसान हे (Mango Fruit Crop) आंबा आणि द्राक्ष बागांचे झाले होते. आंब्याला मोहोर लागण्याची प्रक्रियाच मंदावली होती. अता जिल्ह्यासह कोकणातही वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. यामध्ये फवारणीच्या माध्यमातून किडरोगराईचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले तर आंब्याला मोहोर लागणार आहे. आता हे पिक अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी हा विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम राबवला तर आंबा पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे.

कसे करावे लागणार आहे व्यवस्थापन?

*आता पावसाने उघडीप दिली असून वातावरण हे कोरडे झाले आहे. पालघरसह कोकणात 19 ते 23 अंश किमान तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, मोहोर संरक्षण आणि फळांचे व्यवस्थापन ही महत्वाची प्रक्रिया आहे. *आंब्याच्या कैऱ्या ह्या वटाण्याच्या आकाराच्या झाल्या की, प्रत्येक झाडाला 150 ते 200 लिटर पाणी देणे आवश्यक राहणार आहे. अशाच प्रकारे 15 दिवसांच्या अंतराने अंदाजे 3 ते 4 वेळेस अशाप्रकारे पाणी दिल्यास फळगळ ही कमी फळांचा आकार वाढणार आहे. जर फळधारणा होऊन 75 दिवस उलटले असतील तर मात्र, पाणी देण्याची आवश्यकता लागणार नाही. आंब्याच्या मोहोराचे संरक्षण करताना तिसऱ्या व सहाव्या फवारणीच्या प्रसंगी युरियाचे मिश्रण करुन फवारणी केल्यास फळाची वाढ ही जोमात होणार आहे.

मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण

मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि निर्माण झालेल्या वातावरणामुळे आंब्याला मोहोर लागत नव्हता. आता उशिराने का होईना हवामान पोषक झाले आहे. आंब्याला मोहोर लागण्यासाठी थंड वातावरण आवश्यक असते. आता पावसाने तर उघडीप दिली आहे. शिवाय 15 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेटची फवारणी या दरम्यान केली तर एकसारखा मोहोर लागण्यास मदत होणार असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे डॅा. बाळासाहेब सावंत यांनी सांगितले आहे.

…म्हणून किडीचे व्यवस्थापन गरजेचे

सध्या म्हणावी तशी थंडी नाही. जर थंडीमध्ये खंड पडून उष्णता निर्माण झाली तर मात्र, मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. किडनियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, मोहोराचे संरक्षण होईल अशा किटकनाशकांची फवारणी ही गरजेची आहे. अन्यथा मोहोरावर किडीचा प्रादु्र्भाव झाल्यास पुन्हा मोहोर गळतीचा धोका निर्माण होणार आहे. सध्या वातावरण कोरडे असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली तर मात्र, झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी आहे.

संबंधित बातम्या :

PM KISAN YOJNA : अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा, तरच मिळणार पीएम किसान निधी योजनेचा 10 हप्ता

शेतकरी दुहेरी संकटात : पपई बागेवर फिरवला नांगर, कवडीमोल दरामुळे शेतकरी हतबल

साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर, गाळप हंगामाच्या दोन महिन्यांनंतर काय आहे उत्पादनाची स्थिती?

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.