AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी दुहेरी संकटात : पपई बागेवर फिरवला नांगर, कवडीमोल दरामुळे शेतकरी हतबल

पिक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगाव येथील शेतकऱ्याने पारंपारिक पिकांना फाटा देत 7 हजार पपईची लागवड केली होती. मात्र, वर्षभर बाग जोपासून आता कवडीमोल दर मिळत असल्याने काढणीवर अधिकचा खर्च न करता या बागेवर नांगर फिरवणेच शेतकऱ्याने पसंत केले आहे.

शेतकरी दुहेरी संकटात : पपई बागेवर फिरवला नांगर, कवडीमोल दरामुळे शेतकरी हतबल
पपई शेती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 13, 2021 | 12:04 PM
Share

औरंगाबाद : वातावरणातील बदल, प्रतिकूल परस्थिती, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांवर चोहीबाजूने संकटाची मालिका ही सुरुच आहे. एवढे असतानाही बाजारपेठेतील उत्पादनाचे घटते दर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगाव येथील शेतकऱ्याने पारंपारिक पिकांना फाटा देत 7 हजार (Papaya Garden) पपईची लागवड केली होती. मात्र, वर्षभर बाग जोपासून आता (Fall in Rates) कवडीमोल दर मिळत असल्याने काढणीवर अधिकचा खर्च न करता या बागेवर नांगर फिरवणेच शेतकऱ्याने पसंत केले आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असतानाच हे झालेले नुकसान कसे भरुन काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

अथक परिश्रम, मात्र दर परस्वाधिन

यंदा कधी नव्हे ते पिकांमध्ये बदल करुन थेरगाव येथील सोमनाथ निर्मळ यांनी 7 हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. हातउसणे पैसे घेऊन त्यांनी हे धाडस केले होते. शिवाय बाग जोपासण्यासाठी अथक परिश्रम आणि अवकाळी पावसातून बचाव व्हावा म्हणून औषधावरही मुबलक खर्च त्यांनी केला होता. मात्र, आता तोडणी करतानाच व्यापारी बागेकडे फिरकेना झाले आहेत. तर स्थानिक पातळीवर 2 ते 3 रुपये किलोने मागणी होत आहे. त्यामुळे तोडणीचाही खर्च पदरी पडत नसल्याने निर्मळ यांनी या बागेवर ट्रक्टरच फिरवला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण आता पैशाची परतफेड करायची कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे.

रब्बीचे पिक घेण्यासाठी केले क्षेत्र रिकामे

पपई उत्पादनातून चार पैसे पदरात पडतील ही आशा धुसर झाली होती. किमान या बागेच्या क्षेत्रात रब्बी हंगामातील पिक घेऊन उत्पादन वाढवावे या आशेने निर्मळ यांनी ही पपईची बाग मोडली असून आता हरभरा किंवा गव्हाचे उत्पादन घेतले जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. यातच बाजारपेठतही दिलासादायक चित्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. अशा नुकसनीमुळे नविन प्रयोग करण्यापेक्षा पारंपारिक पिकेच बरी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

अधिकचे उत्पन्न तर नाहीच पण पदरमोडच

मराठवाड्यातील शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, याला निसर्गाची साथ लाभत नाही. गेल्या तीन वर्षापासून खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुख्य पीक सोयाबीनचे नुकसान हे ठरलेले आहे. मात्र, उत्पन्न वाढीसाठी शेतकरी काही क्षेत्रावर फळबागाचे प्रयोग करीत आहेत. मात्र, कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील दराची अनियमितता यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हतबल आहे.

संबंधित बातम्या :

साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर, गाळप हंगामाच्या दोन महिन्यांनंतर काय आहे उत्पादनाची स्थिती?

Crop Cover | ‘त्याने’ केले पुर्वनियोजन, म्हणूनच 850 हेक्टरापैकी केवळ 3 एकरातील द्राक्ष बागेचे झाले संरक्षण

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

Follow Us
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना