साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर, गाळप हंगामाच्या दोन महिन्यांनंतर काय आहे उत्पादनाची स्थिती?

साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर, गाळप हंगामाच्या दोन महिन्यांनंतर काय आहे उत्पादनाची स्थिती?
साखर कारखान्याचे संग्रहीत छायाचित्र

साखऱ कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरु असून उत्पादनाबरोबरच साखरेच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास 70 टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 13, 2021 | 11:22 AM

पुणे : (Sugarcane Sludge Season) ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे साखऱ कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरु असून उत्पादनाबरोबरच (Sugar Exports) साखरेच्या निर्यातीमध्ये (Maharashtra State) महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास 70 टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. शिवाय भविष्यातही साखरेचे दर वाढतीव या अपेक्षेने साखर कारखानदार हे निर्यातीचा करार न करता कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर देत आहे. देशांतर्गत साखरेचे वाढते उत्पादन आणि जागतिक पातळीवर होत असलेली मागणी यामुळे साखर उत्पादकांना अच्छे दिन येणार असेच चित्र आहे.

राज्यात 182 साखर कारखान्यांचे गाळप सुरु

राज्यात 15 ऑक्टोंबरपासून गाळप हंगामाला सुरवात झाली होती. हंगामाच्या सुरवातीला साखर आयुक्त यांची परवानगी नसल्याने काही कारखाने हे सुरुच झाले नव्हते. पण आता 182 साखर कारखाने हे सुरु झाले आहेत. यामध्ये 91 सहकारी तर 91 हे खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखरेच्या उताऱ्यावर उत्पादन हे अवलंबून असते. राज्यात सर्वाधिक म्हणजे 10 टक्के उतार हा कोल्हापूर विभागात आहे. तर संपूर्ण राज्याचा उतारा हा 9.21 टक्के आहे. आतापर्यंत या साखऱ कारखान्यांच्या माध्यमातून 272 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर त्याबदल्यात 252 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हे झालेले आहे.

कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर

यंदा ऊसाचे विक्रमी गाळप होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता हंगाम ऐन मध्यावर आलेला आहे. देशांतर्गतपेक्षा निर्यातीवर कारखान्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र, सध्या साखरेचे दर हे स्थिर असून नविन वर्षात हे दर वाढतील असे अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे साखर कारखानदार हे निर्यातीपेक्षा कच्च्या साखरेची साठवणूक करीत आहे. अधिकच्या दराच्या अपेक्षेने हे धाडस साखर कारखानदार करीत असून आतापर्यंत सर्वाधिक निर्यात ही महाराष्ट्रातून झालेली आहे.

देशांतर्गत विक्रीपेक्षा निर्यातीवरच भर

देशात महाराष्ट्र आणि जागतिक पातळीवर साखरेच्या उत्पादनात भारत देश कायम आघाडीवर राहिलेला आहे. मात्र, देशांतर्गत विक्रीपेक्षा साखरेची निर्यात अधिकची फायद्याची असल्याने कारखाने हे निर्यातीलरच भर देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कच्च्या साखरेची निर्मिती करायची आणि त्याची निर्यातयावरच कारखान्यांचा भर आहे. यंदा तर पोषक वातावरणामुळे ऊसाचे गाळप विक्रमी होणार असून अधिकतर कारखान्यांना आता साखर आयुक्तांकडून परवानगीही मिळालेली आहे.

संबंधित बातम्या :

Crop Cover | ‘त्याने’ केले पुर्वनियोजन, म्हणूनच 850 हेक्टरापैकी केवळ 3 एकरातील द्राक्ष बागेचे झाले संरक्षण

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना ‘हे’ आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें