Heavy Rain : सात लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान, शेतजमिनही खरडून गेली, कृषी विभागाच्या अहवालात चित्र स्पष्ट..!

पिकांचे नुकसान झाले तरी सततच्या पावसामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करणे शक्य झाले नाही. राज्यात सर्वाधिक नुकसान हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे झाले आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने आणि यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गतआठवड्यात 3 लाख 50 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल होता. मात्र, त्यामध्ये नव्याने क्षेत्राची वाढ झाली असून आता थेट 7 लाख 24 हजार हेक्टरापर्यंतचे नुकसान झाले आहे.

Heavy Rain : सात लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान, शेतजमिनही खरडून गेली, कृषी विभागाच्या अहवालात चित्र स्पष्ट..!
अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेतजमिनही खरडून गेली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे

|

Jul 24, 2022 | 4:09 PM

पुणे : राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी जुलैच्या सुरवातीपासून (Heavy Rain) पावसाने घातलेल्या थैमानाचा परिणाम आता समोर येत आहे. ज्या (Kharif Season) हंगमातून शेतकऱ्यांना अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा असते त्या (Crop Damage) खरिपातील पिकांचेच नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पेरणी होताच झालेल्या या अतिवृष्टीचा परिणाम आता थेट उत्पादनावर होणार आहे. केवळ पिकांचेच नुकसान असे नाहीतर शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून गेल्या आहेत. सलग 18 दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील 7 लाख हेक्टरावरील पीके बाधित झाली आहेत तर 3 हजार 225 हेक्टरावरील शेतजमिनही खरडून गेली आहे. पिकांचे नुकसानभरपाई मिळेल पण जमिनीचे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 24 जिल्ह्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचा अहवाल आता कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये आणखी वाढ होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

पंचनाम्याला सुरवात

पिकांचे नुकसान झाले तरी सततच्या पावसामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करणे शक्य झाले नाही. राज्यात सर्वाधिक नुकसान हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे झाले आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने आणि यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गतआठवड्यात 3 लाख 50 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल होता. मात्र, त्यामध्ये नव्याने क्षेत्राची वाढ झाली असून आता थेट 7 लाख 24 हजार हेक्टरापर्यंतचे नुकसान झाले आहे. नुकसानीची दाहकता पाहता पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले असून प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली आहे. नुकसानभरपाईचा निकष कसा लावला जातो यावरही सर्वकाही अवलंबून आहे.

शेतजमिनही खरडून गेली

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना तर फटका बसलेला आहेच पण शेतजमिनही खरडून गेली आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे असे प्रकार वाढले आहेत. गतवर्षी लातूर जिल्ह्यामध्येही असे प्रकार वाढले होते. मात्र, मदत मिळाली तर केवळ पीक नुकसानीची. शेतजमिन खरडून गेल्याने दुहेरी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत ही मिळालेली नव्हती. आता खरडून गेलेल्या क्षेत्रावर नव्याने गाळ टाकल्याशिवाय पर्यायच नाही. नुकसानीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 321 हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील 142 हेक्टर, अमरावती-1 हजार 241 हेक्टर, नांदेड 1 हजार 129 हेक्टर, पुणे-175 हेक्टर, नंदुरबार-27 हेक्टर तर ठाणे जिल्ह्यातील 14 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

सोयाबीन, कापसाचे सर्वाधिक नुकसान

अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्याती शेतकऱ्यांचेच अधिकचे नुकसान झाले आहे. विदर्भामध्ये कापसाचे क्षेत्र तर मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या दोन विभागालाच बसलेला आहे. यामुळे नुकसानीमध्ये सोयाबीनचे प्रमाण अधिक आहे तर त्या पाठोपाठ कापसाचीही तीच अवस्था आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची उगवण होताच पंचनामे करण्याची नामुष्की ओढावली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें