हिंगोलीच्या हळदीला परराज्यातही मार्केट, आवक वाढल्याने वजन काटेही पडत आहेत कमी

कारभारात तत्परता असली काय होऊ शकते याचे उदाहण सध्या हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजारात पाहवयास मिळत आहे. हळदीचा काटा झाला की, पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये यामुळे केवळ जिल्ह्यातूनच नाही तर औरंगाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नांदेड या जिल्ह्यातून हळदीची आवक होत आहे. भल्या पहाटेच वाहनांच्या रांगा ह्या बाजार समितीच्या आवारात पाहवयास मिळत आहे.

हिंगोलीच्या हळदीला परराज्यातही मार्केट, आवक वाढल्याने वजन काटेही पडत आहेत कमी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:35 PM

हिंगोली : कारभारात तत्परता असली काय होऊ शकते याचे उदाहण सध्या (Hingoli Market Committee) हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजारात पाहवयास मिळत आहे. हळदीचे वजन झाला की, पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये यामुळे केवळ जिल्ह्यातूनच नाही तर औरंगाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नांदेड या जिल्ह्यातून हळदीची आवक होत आहे. भल्या पहाटेच वाहनांच्या रांगा ह्या (the arrival of turmeric increased) बाजार समितीच्या आवारात पाहवयास मिळत आहे. वाढत्या आवकमुळे आता वजनकाटे कमी पडत असल्याने त्याचे नियोजन बाजार समितीला करावे लागत आहे. सकाळच्या प्रहरीच 3 हजार 500 क्विंटल हळदीची आवक येथील बाजारपेठेत होत आहे. शिवाय राज्यभरातून आवक आणि परराज्यात मार्केट अशी अवस्था या हळदी बाजाराची झाली आहे.

सौंदार्य प्रसाधनांसाठी परराज्यातून मागणी

हळदीचा उपयोग सौंदार्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच राज्यस्थान, पंजाब, गुजरात या राज्यातून हिंगोलीच्या हळदीला मागणी आहे. सध्या आवक वाढली असली तरी 7 हजार 500 ते 8 हजार 500 चा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवाय आवक कितीही झाली तरी मात्र, शेतकऱ्यांना त्याच दिवशी रक्कम दिली जाते. त्यामुळे राज्यभरातून आवक होत आहे. दरातील तेजीमुळे भल्या पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा येथील बाजार समितीच्या समोर लागलेल्या असतात.

यामुळे हिंगोलीच्या हळदीला आहे मागणी

मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक येथे होते. येथील व्यवहार चोख असल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही याच बाजारपेठेकडे अधिक आहे. शिवाय येथील हळदीमध्ये कुकुरमीन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने सांगली, सातारा या भागातून मोठी मागणी आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे घटक असल्याने कंपन्यामध्ये मोठी मागणी आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.

योग्य नियोजनामुळे बाजारपेठेला महत्व

हळदीसाठी हिंगाली येथील बाजारपेठ एक मुख्य आगार मानले जात आहे. वाढत्या आवकमागे कारणही तसेच आहे. हळदीचा वजनकाटा झाला की, शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जातात. इतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना केवळ वायदे दिले जातात. विक्रीनंतरही पैशासाठी खेटे मारावे लागतात. चोख व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा कल याच बाजार समितीकडे अधिकचा आहे. आता आवक वाढल्याने वजनकाटे देखील कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वजन काटे वाढवण्याचे नियोजन असल्याचे बाजार समितीचे सचिव नारायन पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : तुरीवर मर तर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन तरच पडेल पिक पदरात !

उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीमध्ये ‘बोयोसिरप’ची महत्वाची भूमिका, काय आहे नवे तंत्र?

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, आता सोयाबीनची साठवणूक की विक्री ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.