दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात

पेरणीला महागडे खत, मशागतीवर अमाप खर्च आणि शेती मालाला कवडीमोल दर यामध्येच शेतकरी मेटाकूटीला येत आहे. (Farmers in trouble) खरीपात एकाही पीकाला चांगला दर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असतानाही त्याने रब्बीची तयारी सुरु केली होती मात्र, आता रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे.

दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:57 PM

मुंबई : पेरणीला महागडे खत, मशागतीवर अमाप खर्च आणि शेती मालाला कवडीमोल दर यामध्येच शेतकरी मेटाकूटीला येत आहे. (Farmers in trouble) खरीपात एकाही पीकाला चांगला दर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असतानाही त्याने रब्बीची तयारी सुरु केली होती मात्र, आता रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. (Increase in chemical fertilizer prices) एकीकडे सरकार उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची अशी क्रुर चेष्टा करीत आहे. आता खतांच्या किंमती ह्या 50 ते 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. एन.पी.के. (नत्र, स्फूरद, पालाश) खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

डी.ए.पी स्थिर मात्र मिश्र खतांच्या दरात वाढ

सरकारने डी.ए.पी. (डाय अमोनियम फॉस्फेट) ची किंमत 1200 रुपयेपर्यंत स्थिर ठेवली आहे. मात्र, पेरणीच्या दरम्यान मिश्र आणि एन.पी.के या खतांचा वापर केला जातो. यामध्येच 50 ते 500 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 12:32:16 या मिश्र खताच्या एका 50 किलोच्या पोत्यासाठी शेतकऱ्यांना आता 17oo रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे. 10:26:26 या मिश्र खताच्या गोणीमागे 400 रुपये वाढ झाली आहे. 20:20:00 खतांच्या गोणीमागे 150 रुपयांची वाढ झाली आहे. पालाशच्या गोणीमागे 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर युरिया 50 रुपये किलो होता तो आता 45 रुपये किलो मिळत आहे.

लिंकिंगसाठी तगादा…

जर शेतकऱ्याने युरिया किंवा महाधन हे खत घेतले तर सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा दुय्यम अन्नद्रव्ये असणारी रासायनिक खते शेतकऱ्यांना घ्यावीच लागत आहेत. त्याशिवाय इतर खते ही दिली जात नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव ही खते घ्यावीच लागत आहेत. या खतांची ना गुणवत्ता तपासली जाते ना दर आखून दिलेले असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजून ही खते घ्यावी लागतात. कमी विषारी असलेल्या सेंद्रिय खताचा कायम तुटवडा बाजारात निर्माण केला जातो. त्याचा फायदा विक्रेते घेतात.

कृषी विभागाचेही दुर्लक्ष

सेंद्रिय खते, सेंद्रिय औषधे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. गावोगाव यासाठी एजंट नेमले आहेत. शेतकऱ्यांच्या गळ्यात ही खते घातली जात आहेत. मात्र, कृषि विभागाने सेंद्रिय खतांतील, औषधातील घटकांची गुणात्मक, परिमाणात्मक तपासणी गरजेचे आहे. यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली जाते पण कारवाई होत नाही. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत पण विक्रेत्यांचा फायदा हा कमी झाला आहे. पूर्वी शेतकऱ्यांशी संबंध असल्याने खत-बियाणे हे उधारीवर दिले जात होते. पण आता यावर अंकूश येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा हातऊसणे किेवा कर्ज काढून चाढ्यावर मूठ धरावी लागणार आहे.  (Increase in chemical fertilizer prices even before rabi sowing begins, farmers’ problems)

संबंधित बातम्या :

शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता

दिवाळीपर्यंत कांद्याचे दर ‘तेजीतच’, देशाच्या राजधानीत लासलगावचा कांदा

मोदी सरकारची उद्दीष्टपूर्ती : अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप, कसा गाठला टप्पा ?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.