AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपर्यंत कांद्याचे दर ‘तेजीतच’, देशाच्या राजधानीत लासलगावचा कांदा

कांद्याचेच नव्हे तर इतर सर्व भाजीपाल्याचेही दर हे वाढलेले आहेत. ठोक बाजारात हे दर नियंत्रणात असले तरी मात्र, किरकोळ बाजारात गगणाला भिडलेले आहेत. हवामानाचा परिणाम आणि मध्यंतरी पावसाचा मारा यामुळे भाजीपाल्याचे प्रचंड असे नुकसान झाले होते. त्यामुळेच आता दर वाढलेले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी हेच दर कायम राहतील किंवा यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाद व्यक्त होत आहे.

दिवाळीपर्यंत कांद्याचे दर 'तेजीतच', देशाच्या राजधानीत लासलगावचा कांदा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 5:33 PM
Share

मुंबई : कांद्याचेच  (Onion) नव्हे तर इतर सर्व भाजीपाल्याचेही दर हे वाढलेले आहेत. ठोक बाजारात हे दर नियंत्रणात असले तरी मात्र, किरकोळ बाजारात गगणाला भिडलेले आहेत. (Effect Climate) हवामानाचा परिणाम आणि मध्यंतरी पावसाचा मारा यामुळे भाजीपाल्याचे प्रचंड असे नुकसान झाले होते. त्यामुळेच आता दर वाढलेले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी हेच दर कायम राहतील किंवा यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाद व्यक्त होत आहे.(Onion Price) कांदा हे नगदी पीक असून कधी शेतकऱ्याच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. यावेळी मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे ऐन

सणामध्ये किचनचे बजेट हे कोलमडले आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे भाजीपाल्याचा पुरवठा हा शहरी भागात सुरळीत झाला नाही त्यामुळे मागणी वाढली पण पुरवठा न झाल्याने दर वाढत आहेत. नाशिक ही देशातील कांद्याची महत्वाची बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतील कांद्याचा पुरवठा देशाच्या राजधानी दिल्लीत होत आहे. कांद्याबरोबर इतर भाजीपाल्यांचेही दर हे वाढलेले आहेत. वाहतूक वेळेत न झाल्याने महानगरातील दर वाढलेले आहेत

नविन भाजीपाल्याची आवकही लांबणीवर

पावसामुळे यंदा शेतीचे गणितच बिघडले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने भाजीपाल्याची लागवड ही वेळेत झाली नाही. आता पावसाने उघडीप दिली आहे. पण खूप उशीर झाला आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणारा मालही उशीराच बाजारात येणार आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत का होईना दर हे वाढलेलेच राहणार आहेत.

कांद्याचा भाव दुप्पट

नाशिक येथील लासलगावहून दिल्लीला सर्वाधिक कांद्याचा पुरवठा होतो. गेल्या महिन्याभरात घाऊक कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत. 16 सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारातील सरासरी घाऊक किंमत 14.75 रुपये प्रति किलोवरून 16 ऑक्टोबर रोजी 33.40 रुपये प्रति किलो झाली आहे. 120 टक्क्यांनी वाढली आहे. बेंगळुरू एपीएमसीयेथील कांद्याचे दर 8 सप्टेंबर रोजी 10 रुपये किलोवरून 13 ऑक्टोबर रोजी 35 रुपये प्रति किलोवर पोहोचले. उत्तर कर्नाटकातील हुबळी मार्केटमध्ये जिथे खरीप कांदा पिकाची कापणी केली जात आहे, तेथे सरासरी भाव 16 सप्टेंबर रोजी 8.50 रुपये प्रति किलोवरून 16 ऑक्टोबर रोजी 14.50 रुपये प्रति किलो झाले आहेत.

साठवणूकीतला कांदा बाजारात

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ज्या राज्यांमध्ये किंमती भारताच्या सरासरीपेक्षा जास्त वाढत आहेत अशा राज्यांमध्ये बफर स्टॉकमधून कांदा वितरित करण्यास सुरुवात केली आहे. 2021-22 साठी तयार करण्यात आलेल्या 2,08,000 टन बफर स्टॉकपैकी 67,375 टन साठा 12 ऑक्टोबरपर्यंत वाटप करण्यात आल्याते स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचे मरण व्यापाऱ्यांची चांदी

ठोक बाजारात कांद्याच्या किमती ह्या कमी आहेत. शेतकऱ्यांकडून 20 ते 25 रुपये किलोने घेतलेला कांदा व्यापारी किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये किलोने विकत आहेत. त्यामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. (Prices rise as onion arrivals fall, new onions in market shortage)

संबंधित बातम्या :

मोदी सरकारची उद्दीष्टपूर्ती : अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप, कसा गाठला टप्पा ?

…तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

भविष्यातील धोका टाळण्यासाठी माफक दरात सोयाबीनची विक्री

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.