Jalna : खत विक्रीत अनियमितता, एका फोनवर परवाना निलंबित, जालना कृषी विभागाचा ‘पॅटर्न’ काय ?

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी जालन्यावर पावसाची कृपादृष्टी अधिक राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड यापूर्वीच केली आहे. पण आता सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. आता मंडळाच्या आणि गावस्तरावर कृषी सेवा केंद्र थाटण्यात आली आहेत. मात्र, अधिकच्या दराने विक्री, लिंकिंग पध्दती आणि कृत्रिम टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Jalna : खत विक्रीत अनियमितता, एका फोनवर परवाना निलंबित, जालना कृषी विभागाचा 'पॅटर्न' काय ?
खत विक्रीसाठी डिस्पेच आयडी न मिळाल्याने पालघर जिल्ह्यात खत विक्रीला ब्रेक आहे.
राजेंद्र खराडे

|

Jun 28, 2022 | 6:45 AM

जालना : मराठवाड्यात वरुणराजाची कृपादृष्टी झाली असल्याने पुन्हा बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळ सुरु झाली आहे. पावसामुळे पोषक वातावरण झाले असले तरी बाजारपेठतील समस्या ह्या कायम आहेत. बाजारपेठत (Chemical Fertilizer) रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई असल्याचे भासवत (Fertilizer Rate) चढ्या दराने विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता जिल्हा कृषी कार्यालयाच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विक्रेत्याकडून एमआरपी पेक्षा अधिक दराने खताची विक्री केली जात असली तर एका फोनवर शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली जाणार आहे. एवढेच नाही शेतकऱ्यांच्या एका फोनवर कृषि सेवा केंद्राचा परवाना देखील रद्द होणार आहे .(Agricultural Department) कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खत विक्रीतील अनियमिततेला आळा बसणार आहे.

शेतकऱ्यांनो अशाप्रकारे नोंदवा तक्रार

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हंगामाच्या सुरवातीपासून जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला आहे. खत विक्रेता जर निश्चित दरापेक्षा अधिकच्या दराने खताची विक्री करीत असेल तर शेतकऱ्यांना नियंत्रण कक्षातील 9823915234 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. यावेळी खताचे नाव, एमआरपी, खत खरेदीची पावती याची माहिती फोनद्वारे द्यावी लागणार आहे. यावरुन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तर नोंद होणारच आहे पण कारवाईच्या अनुशंगाने सोईस्कर व्हावे म्हणून तालुका कृषी कार्यालयालाही माहिती दिली जाणार आहे. एवढेच नाही तर मेल करुनही तक्रार नोंदवता येणार आहे. याकरिता dsaojalna@gmail.com किंवा adozpjalna@gmail.com या मेल आयडीवरही तक्रार नोंदवता येणार आहे.

कशामुळे ओढावली परिस्थिती?

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी जालन्यावर पावसाची कृपादृष्टी अधिक राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड यापूर्वीच केली आहे. पण आता सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. आता मंडळाच्या आणि गावस्तरावर कृषी सेवा केंद्र थाटण्यात आली आहेत. मात्र, अधिकच्या दराने विक्री, लिंकिंग पध्दती आणि कृत्रिम टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याबबतीत तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना थेट तालुका कृषी कार्यालयात यावे लागत होते. म्हणून ही सोय कृषी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हाभरातून शेतकरी तक्रार नोंद करीत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक चांदवडे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

तक्रार नोंद झाली की परवाना रद्द

शेतकऱ्यांची अडवणूक किंवा अधिकच्या दराने खताची विक्री झाल्याची तक्रार नोंद झाल्यास भरारी पथकाकडून याची तपासणी केली जाणार आहे. खत विक्रीची पावतीवरील किंमत आणि प्रत्यक्ष खताची किंमत याची तपासणी केली जाणार आहे. याकरिता तालुकानिहाय भरारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एमआरपी नुसारच खताची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें