Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते.

Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
नाल्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडात घडली आहे.
राजेंद्र खराडे

|

Jun 27, 2022 | 4:44 PM

नांदेड : गेल्या मिहन्याभरापासून गायब असलेल्या (Heavy Rain) पावसाने आता मराठवाड्यात रौद्ररुप धारण केले आहे. यामध्ये नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये तर गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड हे आपल्या शेतीकडे जात असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यात वृध्द (Farmer Death) शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. त्यामुळे महिन्यापासून दडी मारलेला पाऊस आता सक्रीय झाला असून ढगफुटीसदृश्य या पावसामुळे अधिकचे नुकसानच होऊ लागले आहे. एकीकडे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण यामुळे मनुष्यहानीही झाली आहे.

नेमकी कशी घडली घटना?

कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते.परंतु ते दुपार पर्यंत घरी परतले नसल्यामुळे घरच्या मुलांनी शेताकडे जाऊन शोधाशोध केला परंतु वडील दिसत नसल्यामुळे रानोमाळ फिरुन कुठेही दिसून आले नाही यातच गावालगत असलेल्या रस्त्यावरील नाल्यात हातातील काठी आढळून आली .यावरून शोध घेतला असता त्याच नाल्यात मृतदेह आढळून आला आहे.

घटनेची नोंद पोलिस ठाण्यात

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती बोरगडी सज्जाचे तलाठी आमनवाड यांना देण्यात आली. महसूल प्रशासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे तलाठी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक भुसनुर यांनी देखील भेट देऊन कुटुंबियाचे सांत्वन केले. कारला येथील वृध्द शेतकऱ्याचा पहिल्याच मुसळधार पावसामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता सदरील शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणत्या पिकांचे नुकसान ?

आता पाऊस प्रमाणात असता तर कदाचित याचा फायदा या पिकांना झाला असता. मात्र, ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि बियाणेही पाण्यात गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती पण काही मंडळात पावसाने थैमान घातले आहे. जांभळा येथील ओढे, नाले हे तुडुंब भरुन वाहत आहेत. मात्र, पेरलेल्या आणि उगवण झालेल्या पिकांचेही नुकसान झाल्याने पंचनामे करुन मदतीची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें