शेतकरीविरोधी कायद्याविरोधात जळगावातही काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांना कडाडून विरोध

जळगावात काँग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांचा निषेध नोंदवला. यावेळी शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरीविरोधी कायद्याविरोधात जळगावातही काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांना कडाडून विरोध

जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी देशभरात रान पेटवले आहे. या कायद्यांमुळे शेतकरी तसेच कामगार देशोधडीला लागतील. त्यामुळे हे कायदे मागे घ्यावेत, अशी विरोधकांनी मागणी आहे. याच मागणीसाठी आज (9 नोव्हेंबर) दुपारी जळगावात काँग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांचा निषेध नोंदवला. यावेळी शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील काँग्रेस भवनापासून दुपारी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक प्रकाश मुगदिया, काँग्रेसचे जिल्हभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या रॅलीत महिला कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती.

रॅलीतील प्रत्येक ट्रॅक्टरवर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा असलेले फलक लावण्यात आले होते. रॅलीदरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारची धोरणे, शेतकरी तसेच कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाषणे केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी कृषी कायद्यांना जोरदार विरोध करत केंद्र सरकारला धारेवर धरलं. तसेच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

राज्य सरकार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कोल्हापूर, बुलडाणा, जळगावात चक्काजाम

काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *